Home | News | Rajkummar Rao Said He Will Never Advise Anyone To Reduce Or Gain Weight

राजकुमार म्हणतो, मी कोणालाही वजन कमी करणे अथवा वाढवण्याचा सल्ला देणार नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 23, 2017, 01:05 PM IST

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने त्याच्या चित्रपटांसाठी कधी वजन कमी केले

  • Rajkummar Rao Said He Will Never Advise Anyone To Reduce Or Gain Weight
    मुंबई - बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने त्याच्या चित्रपटांसाठी कधी वजन कमी केले तर कधी वाढवले. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "मी कधीच कोणाला वजन कमी करण्याचा अथवा वाढवण्याचा सल्ला देणार नाही कारण ते तब्येतीसाठी योग्य नाही. तु वजन का वाढवलेस यावर बोलताना राजकुमारने सांगितले की, हे सर्व माझ्या कामाचा भाग आहे. मला जी भूमिका मिळते त्यात स्वतःला फिट बसविण्यासाठी मला वजन कमी करणे अथवा वाढवणे गरजेचे असते."
    राजकुमारने सांगितले की, 'बोस' चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्याने वजन वाढवले आहे. या चित्रपटात राजकुमार राव सुभाषचंद्र बोस यांची भूमिका करत आहे. राजकुमारने या भूमिकेसाठी जवळपास 10 ते 11 किलो वजन वाढवले आहे. राजकुमारने ट्रॅप्ड चित्रपटासाठी त्याचे वजन फार कमी केले होते. राजकुमार सध्या वजन वाढवण्यासाठी बिर्याणी आणि पिझ्झा खात आहे.

Trending