मुंबई : 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'थ्री इडियट्स', 'पीके' या हिट सिनेमांचे दिग्दर्शक राजू हिरानी यांना लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. बाईक चालवण्याचा प्रयत्न करताना वळणावर घसरल्यामुळे हिरानी यांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे.
वांद्र्याच्या पाली हिल परिसरात राजू हिरानी बाईक चालवत होते. त्यावेळी पडल्याने मंगळवारी पहाटे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिरानी यांच्या जबड्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे
हिरानी सध्या डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीत उपचार घेत आहेत. शस्त्रक्रियेनंतर राजू हिरानींच्या प्रकृतीबाबत डॉक्टर माहिती देतील. हिरानी दिग्दर्शित 'साला खडूस' हा सिनेमा अंतिम टप्प्यात आहे.