आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 60 पार झाल्या राखी, या 15 अॅक्ट्रेसेस आता दिसयला लागल्या अशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार 69 वर्षांच्या झाल्या आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी राखी यांचा जन्म पश्चिम बंगालमधील रानाघाट येथे झाला होता. येथीलच गर्ल्स स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचे लग्न बंगाली पत्रकार आणि चित्रपट दिग्दर्शक अजय बिश्वास यांच्यासोबत झाले होते. त्यानंतर दोन वर्षांनी त्याच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर जवळपास 8 वर्षांनी राखी यांनी दुसरे लग्न प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्यासोबत झाले. या दोघांची मुलगी मेघना गुलजार आता दिग्दर्शक आहे.
20 व्या वर्षी रुपेरी पडद्यावर
राखी 20 व्या वर्षी रुपेरी पडद्यावर झळकल्या होत्या. 1967 मध्ये 'बधू बरण' या बंगाली चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तीन वर्षांनी 1970 मध्ये त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट आला. त्याचे नाव होते 'जीवन मृत्यू'. यात धर्मेंद्र त्यांचे सहकलाकार होते.

2009 पर्यंत होत्या अॅक्टिव्ह
- राखी यांनी 1967 ते 2009 पर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केले. या काळात त्यांनी प्रमुख भूमिकेपासून चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका केल्या.
- 'शर्मीली' (1971), 'दाग' (1973), 'कसमें वादे' (1978), 'शान' (1980), 'लावारिस' (1981), 'राम लखन' (1989), 'करन अर्जुन' (1995), 'एक रिश्ता : द बॉन्ड ऑफ लाइफ' (2001) आणि 'दिल का रिश्ता'( 2003) सारख्या अनेक चित्रपटातून त्या झळकल्या.

Look बदलला
- राखी यांचे सुरुवातीचे आणि आताचे फोटो पाहिले तर लक्षात येते की या सुंदर अभिनेत्रीचा Look वयानुसार कसा बदलत गेला.
- वयाची साठी-सत्तरी गाठलेल्या या एकेकाळच्या लिडिंग अॅक्ट्रेसला आज ओळखणे अवघड आहे. राखी यांच्यासोबतच त्यांच्या काळातील काही अॅक्ट्रेसेस यांचाही Look बदललेला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रेखा यांच्यासह साठी पार केलेल्या काही अॅक्ट्रेसेसचे Then & Now फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...