आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी सावंत म्हणाली, \'माझ्यासाठी देवी आहे राधे माँ\', स्कर्टमधील फोटोंना सांगितले बनावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- राखी सावंत आणि राधे माँ)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर राखी सावंतच्या सांगण्यानुसार, स्वयंघोषित देवी सुखविंदर कौर अर्थातच राधे माँ तिच्यासाठी देवी आहे. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने राधे माँची वकिली करताना दिसली. राखी म्हणाली, 'मला राधे माँ आवडते. ती नेहमी नव-नवीन कपडे परिधान करते, ज्वेलरी घालते. मला नाही माहित काय आहे, परंतु काहीतरी आहे, म्हणून लोक तिला फॉलो करतात. मला ठाऊक नाही, राधे माँमध्ये देवी आहे, की नाही. परंतु एक महिलेचा सर्वजण आदर करतात हे मला चांगले वाटते.'
इतकेच नव्हे, राखीला राधे माँच्या मिनी स्कर्ट परिधान करण्याविषयी प्रश्न केल्यानंतर ती म्हणाली, किती कलाकारांचे चेहरे न्यूड फोटोंवर बसवले जातात, म्हणून ते फोटो खरे असतात का? राखीच्या सांगण्यानुसारस मिनी स्कर्टमधील फोटो राधे माँचे नाहीये. यावेळी राखीने असाही युक्तिवाद केला, की देवी 24 तास कोणत्याच महिलेच्या शरीरात राहत नाही, त्यामुळे राधे माँने मिनी स्कर्ट परिधान केला तर त्यात काय वाईट आहे.
आसारामवर साधला निशाणा-
राधे माँचा बचाव करच राखीने तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसारामवरसुध्दा निशाणा साधला. राखी म्हणाली, 'बलात्कार करणारा देव कसा होऊ शकतो. असे लोक तुरुंगात आहेत. जर असे लोक बाबा बनू शकतात, तर एक महिला देवी का बनू शकत नाही. कोणत्या पुस्तकात लिहिले आहे, की एक सून एका मुलाची आई देवी बनू शकत नाही.'
राधे माँचे मन झाले म्हणून कुशीत फिरली-
जेव्हा राखी सावंतला विचारले, की राधे माँ भक्तांच्या कुशीत बसते, असे का? यावर राखी सांगते, 'यात चुकीचे काय आहे. राधे माँचे मन झाले म्हणून ती आपल्या भक्तांच्या कुशीत फिरली.' राखी राधे माँच्या फिल्मी गाण्यांवर डान्स करण्यास विरोध करत नाही. ती सांगते, 'जोपर्यंत देवी शरीरात आहे, तोपर्यंत राधे माँ आहे. परंतु देवी निघून गेली, की तीसुध्दा एक सामान्य महिला होऊन जाते. नंतर ती काहीही करू शकते.'
कोण आहे राधे माँ...
राधे माँचे खरे नाव सुखविंदर आहे. तिचा जन्म 4 एप्रिल 1965 रोजी पंजाबच्या गुरुदासपूरमधील रंगाला येथील एका सिख कुटुंबात झाला. वयाच्या 18 व्या वर्षी तिचे लग्न मुकेरियाच्या मानमोहनसिंग नावाच्या तरुणासोबत झाले होते. लग्नानंतर राधे माँचा नवरा नोकरीच्या निमित्ताने कतरची राजधानी दोहा येथे निघून गेला. हलाखीची परिस्थिती असल्याने राधे माँ शिवणकाम करुन घराचा खर्च चालवायची. वयाच्या 21 वर्षी ती महंत रामाधीन परमहंस यांना शरण गेली. परमहंस यांनी सुखविंदरला सहा महिन्यांपर्यंत दीक्षा दिली. त्यानंतर तिचे नाव राधे माँ पडले आणि ती मुंबईत आली.

राधे माँवर काय आहे आरोप?
- मुंबईतील एका विवाहितेने तिच्या सासरच्या मंडळींसह राधे माँवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचा आरोप आहे, की तिच्यासासरची मंडली राधे माँचे भक्त आहेत आणि राधे माँ सांगेल तेच ते करत असतात. माझ्याकडून पैशांची आणि मौल्यवान वस्तूंची मागणी करण्यास राधे माँच सांगत होती, असा विवाहितेचा आरोप आहे.
- राधे माँचे स्कर्ट परिधान केलेली छायाचित्रे समोर आल्यानंतर मुंबईची एक वकील फाल्गुनी ब्रह्मभट‌्टने आणखी एक तक्रार दाखल केले. वकिलाने आपल्या तक्रारीत सांगितले, की राधे माँ धर्मांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे. ती अश्लिलतासुध्दा पसरवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ऋषी कपूर यांनी उडवली राधे माँची खिल्ली, सुभाष घई यांनी केले समर्थन...