आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्न बॅनवर राखीने मोदींचे मानले आभार, म्हणाली आता सनी लियोनला करा बॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पोर्न वेबसाइट्सवर बॅन केल्यानंतर अभिनेत्री राखी सावंत पंतप्रधान मोदी यांची चाहती झाली आहे. राखी म्हणाली, जे काम मोठे-मोठे पंतप्रधान नाही करू शकले, ते काम मोदींनी करून दाखवले. राखीने मोदींकडे अशीही मागणी केली, की बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनलासुध्दा बॅन करा, कारण सनीमुळे बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींना एक्सपोज करावे लागत आहे.
काय म्हणाली राखी-
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितले, 'मोठे-मोठे पंतप्रधान जे काम करू शकले नाही ते मोदींनी केले. मी मोदींची आभारी आहे. प्रत्येक शाळेत पोर्न फिल्म पाहिल्या जातात. 11 वर्षांची मुलेदेखील शाळेत पोर्न फिल्म पाहतात. मुलांना मोबईल फोन आणि लॅपटॉप दिले जातात, त्यामुळे मुले बिघडत आहेत. पोर्नसोबत सनी लिओनलासुध्दा भारतात बॅन करायला हवे. तिला देशातून हकलून लावले पाहिजे. सनीमुळे देशातील इतर अभिनेत्रींना एक्सपोज करावे लागत आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत पंतप्रधान मोदीच आसावे, असे मला वाटते.'
केंद्र सरकारच्या टेलीकॉम डिपार्टमेंटने मागील शुक्रवारी (31 जुलै) 870 पोर्न वेबसाइट्स बॅन केल्या आहेत. मात्र यातील काही वेबसाइट्सवरील बॅन नंतर काढून टाकण्यात आले. सरकारच्या या निर्णयानंतर देशात पोर्नवर बॅन आणि याच्या समर्थानावरून वाद निर्माण झाला.