आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम गोपाल वर्मांकडून रितेशवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले- \'बाहुबली\'नंतर \'शिवाजी\' असेल भव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. स्वतः रितेशने ट्विट करुन सिनेमाचे शीर्षक "छत्रपती शिवाजी" असल्याचे सांगितले होते. ‘मुंबई फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी आपल्या ट्विटमध्ये रितेश देशमुखचा उल्लेख करत रितेश शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवत असल्याचं आपण ऐकल्याचं म्हटलं आहे. या सिनेमाचं बजेट 225 कोटींहून जास्त असल्याचंही राम गोपाल वर्मांनी लिहिलंय.
 
आपल्या ट्विटमध्ये राम गोपाल वर्मा म्हणाले, "After the Bahubali thunder I just heard great news that RiteishDeshmukh is making Shivaji at a whopping cost of more than 225 crores."

सध्या सगळीकडे 'बाहुबली 2' या सिनेमाची जबरदस्त चर्चा रंगतेय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. या सिनेमाचे बजेटसुद्धा 500 कोटींच्या घरात होते. आता मराठीत तब्बल 225 कोटींहून अधिकचे बजेट असलेला रितेशचा 'छत्रपती शिवाजी' हा पहिला मराठी सिनेमा असणारेय. 

महत्त्वाची बाब म्हणजे स्वत: रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाजी महाराजांवरील भव्यदिव्य सिनेमा बनवणा-या रितेशचे राम गोपाल वर्मांनी ट्विटरवरुन आभारदेखील मानले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा रितेश आणि त्याच्या या सिनेमाविषयी आणखी काय म्हणाले राम गोपाल वर्मा... सोबतच बघा, 'छत्रपती शिवाजी' या सिनेमाचे पोस्टर...  
बातम्या आणखी आहेत...