आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ-अभिषेक बच्चनसाठी रामूने लिहिला 'सरकार 3'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चनचे मोठे चाहते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्याविषयी म्हणतात, "या वयाने तुम्हाला चरित्र अभिनेता बनवले, मात्र त्या भूमिकांवर प्रभाव हा अँग्री यंगमॅनचाच असावा. त्यांचे चाहते त्यांना या रुपातच बघणे पंसत करतात.''
राम गोपाल वर्मा यांनी बिग बींसोबत एकुण सहा सिनेमे केले. त्यापैकी पाच सिनेमांमध्ये त्यांची इमेज ही अँग्री यंगमॅनचीच ठेवली. 'सरकार’ (2005), 'निशब्द’ (2007), 'आग’ (2007), 'सरकार राज (2008), 'रन’ (2010), 'डिपार्टमेंट’ (2012) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. मात्र बिग बींच्या भूमिकेची विशेष चर्चा राहिली.
बिग बींचा मुलगा अभिषेकसोबत रामू यांनी 2004 मध्ये 'नाच' हा सिनेमा तयार केला होता. या सिनेमाने अभिषेकला इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत केली होती. बच्चन कुटुंबासोबत असलेल्या मैत्रीच्या संबंधांमुळे रामू यांनी आता 'सरकार 3'ची पटकथा लिहिली आहे.
गेल्या काही वर्षांत सततच्या फ्लॉप सिनेमांमुळे आणि रागिट स्वभावामुळे त्यांचे इंड्स्ट्रीत करिअर जवळजवळ संपुष्टात आले आहे. एकता कपूरसोबत 'ट्रिपल एक्स' हा सिनेमा रामू करत होते, मात्र मतभेदांमुळे एकताने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आता हैदराबादमध्ये रामू यांनी 'सरकार'च्या तिस-या भागाची पटकथा लिहिली आहे.
या सिनेमात अमिताभ आणि अभिषेक बच्चन मेन लीडमध्ये असतील. एका चर्चेदरम्यान रामू यांनी दोघांनाही पटकथा ऐकवली असून त्यांना सिनेमाचा ड्राफ्ट पसंत पडल्याचे म्हटले जाते.
बातम्या आणखी आहेत...