आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Jethmalani Liplock Kishore Kumar’S Wife Leena Chandavarkar

Photos: अवॉर्ड शोमध्ये लीना यांना राम जेठमलानी यांनी केले Kiss

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- लीना चंदावरकर आणि राम जेठमलानी)
मुंबई- 70च्या दशकातील प्रसिध्द अभिनेत्री लीना चंदावरकर सोमवारी (16 फेब्रुवारी) मुंबई आयोजित 'हम लोग' अवॉर्ड सोहळ्यात सामील झाल्या होत्या. या सोहळ्यात प्रसिध्द वकील आणि राजकिय नेते राम जेठमलानीसुध्दा पोहोचले होते. दोघांची अवॉर्ड समारंभात भेट झाली, तेव्हा जेठमलानी यांनी लीना यांना चक्क किस केले.
दोघांची अशी भेट उपस्थितांना आश्चर्यचकित करणारी होती. यावेळी अभिनेता एजाज खानसुध्दा येथे उपस्थित होता. इव्हेंटदरम्यान दोघे सोबत बसलेले होते. जेव्हा दोघांना मंचावर बोलावले तेव्हा जेठमलानी यांनी लीना यांना अलिंगन दिले आणि किस केले. लीना यांनीसुध्दा त्यांचा हात पकडून त्यांना किस करताना दिसल्या. 2014मध्ये राम जेठमलानी यांनी धर्मेंद्र यांना किस करून लोकांना अचंबित केले होते.
लीना यांनी 70च्या दशकात 'महबूब की मेहंदी', 'हमजोली', 'मनचली', 'हनीमून', 'एक कुवांरी एक कुंवारा'सारख्या यशस्वी सिनेमांत काम केले आहे. लीना प्रसिध्द अभिनेते आणि पार्श्वगायक किशोर कुमार याच्या पत्नी आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लीना चंदावरकर आणि राम जेठमलानी यांची 'हम लोग' अवॉर्ड सोहळ्यातील छायाचित्रे...