आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम-रहीमने लाल सुटकेस दाखवून केला होता इशारा, त्यानंतरच पेटवल्या गेल्या दंगली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटक झालेल्या कमांडोजने सांगितले आहे की, राम-रहीम लाल रंगाची सुटकेस दाखवून दंगली सुरू करण्याचा इशारा केला होता. - Divya Marathi
अटक झालेल्या कमांडोजने सांगितले आहे की, राम-रहीम लाल रंगाची सुटकेस दाखवून दंगली सुरू करण्याचा इशारा केला होता.
पंचकुला - बलात्कारी बाबा गुरमित राम-रहीमला पळवण्याचा योजनाबद्ध कट रचलेला होता, अशी माहिती समोर आली आहे. 25 ऑगस्टला पंचकुलामध्ये दंगली भडकण्यापूर्वी आणि नंतर पोलिस जे काही करत होते, त्याची क्षणाक्षणाची माहिती बाबाच्या सेक्युरिटीमध्ये असलेल्या हरियाणा पोलिसांच्या कमांडोंनाही मिळत होती. बाबाच्या सुरक्षेसाठी असलेले हरियाणा पोलिसांचे  हे कमांडो प्रत्यक्षात बाबासाठी (बाबाला पळवण्यासाठी आणि दंगल भडकावण्याचे) काम करत होते.
 
बाबाने लाल रंगाची सूटकेस दाखवून कमांडोना इशारा केला होता, त्यानंतर कमांडोजने सपोर्टर्सना कॉल करून दंगलीचा कट अंमलात आणण्यास सांगितले होते. सेक्युरिटीमध्ये तैनात असलेल्या 7 कमांडोजना पोलिसांनी अटक केली होती. रिमांडमध्ये त्यांची चौकशी करताना हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 

बाबाच्या गाडीत होते सरकारी वायरलेस हँडसेट 
- राम-रहीमच्या जॅमर गाडीत सरकारी वायरलेस हँडसेट होते. पोलिस तीन सिग्नलवर चर्चा करून आपसांत जे काही ठरवत होते, ते मॅसेज बाहेर या कमांडोजपर्यंत पोहोचत होते. बाबाच्या गाडीतून सापडलेले वायरलेस सेट हरियाणा पोलिसांचे आहेत. आता या प्रकरणी आयटी अॅक्टअंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. चौकशीत समोर आले आहे की, पोलिस जे काही प्लान करत होते, ते सर्व मॅसेज बाबाच्या सुरक्षेत असलेल्या जवानांपर्यंत पोहोचत होते. त्याचमुळे राम-रहीमच्या समर्थकांच्या गाड्या फार वेळाने पकडल्या गेल्या होत्या, कारण पोलिस कोणत्या दिशेने काम करत आहे हे समर्थकांना माहिती होते. 
- चौकशीत कमांडोजने सांगितले आहे की, लाल रंगाची सूटकेस दाखवून त्यांना इशारा करण्यात आला होता. त्यानंतर कमांडोजने कॉल करून दंगलीचा कट अंमलात आणण्यास सांगितले. गोंधळ सुरू झाल्यानंतर पोलिसांचे मॅसेज फ्लॅश झाले की, फोर्स कुठे पाठवायची आहे. हे सर्व मॅसेज बाबांचा गटही ऐकत होता. तोच गट बाबाला पळवण्याचा कट रचून आलेला होता. त्यानंतर या गटातील लोकांनी बाबाला सोडवण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांबरोबर मारहाणही केली. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कमांडोने कबुलीजबाबात दिलेली धक्कादायक माहिती..
बातम्या आणखी आहेत...