आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 40 वर्षांनंतर पाकिस्तानात झळकला \'शोले\', कराचीमध्ये झाला प्रीमिअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('शोले' सिनेमातील एका सीनमध्ये अमजद खान आणि धर्मेंद्र)
कराची- 40 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेला भारतीय ब्लॉकब्लस्टर 'शोले' सिनेमा शुक्रवारी (17 एप्रिल) पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा रिलीज झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि जया बच्चन अभिनीत 'शोले' जियो फिल्म्स आणि मेंडवीवाला एंटरटेन्मेंटव्दारा कराचीमध्ये ग्रँड प्रिमीअर ठेवण्यात आले. यामध्ये अनेक सेलेब्सनी भाग घेतला.
सिनेमा समीक्षक उमर अल्वी यांच्या सांगण्यानुसार, 'शोले'चे मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या यादी भारतीय सिनेमे व्हीसीआरवर पाहणारे प्रेक्षकसुध्दा सामील आहेत. या सिनेमाविषय नातेवाईक आणि काही जवळच्या लोकांकडून खूप ऐकले आहे. म्हणून या सिनेमाला पहिल्यांदा 3-डी आणि 2-डी स्वरुपात पाहणे एक वेगळा अनुभव होता.
पाकिस्तानी सिनेमा वितरक आणि एक्सपोर्टर नदीम मेंडवीवाला यांनी आशा व्यक्त केली आहे, की 'शोले' येथे चांगला व्यवसाय करेल.
15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झाला होती 'शोले'-
भारतीय सिनेमामध्ये इतिहास रचणारा 'शोले' 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिनेमाला इतकी लोकप्रियता मिळाली, की यातील गब्बर सिंह, ठाकूर, जय-वीरू, बसंती आणि सूरमा भोपाली या पात्रांना लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांचे डायलॉग्स आजसुध्दा लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. रमेश सिप्पीच्या परफेक्ट दिग्दर्शन आणि अमिताभ, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान, हेमा मालिनी आणि जया बच्चन यांच्या केमिस्ट्रीने सिनेमाला यशोशिखरावर पोहोचवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'शोले' सिनेमातील काही फोटो...