आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबलीचे 'महिष्मती' साम्राज्य पाहाण्याची संधी एवढ्या रुपयांमध्ये उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामोजी फिल्म सिटीने 'बाहुबली'चे महिष्मती साम्राज्याचा सेट आता टूरिस्टसाठी खुला केला आहे. माहिष्मती साम्राज्य पाहाण्यासाठी टूरिस्टला जनरल तिकीट 1250 रुपये तर प्रीमियम 2400 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगळे पॅकेज आहे. याचे बुकिंग फिल्म सिटीच्या ऑफिशियल वेबसाइटवर करता येते. या तिकीटांची विक्री 14 डिसेंबरपर्यंत होणार आहे. याआधी दिवाळी दरम्यान हा सेट सर्व सामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. 
 
- फिल्मच्या दोन्ही पार्टमध्ये महिष्मती साम्राज्याचा सेट उभारण्यासाठी 60 कोटी रुपये खर्च आला होता. फिल्मच्या सीक्वेलमध्ये याच सेटवर काही नवे बदल करुन सीन शूट करण्यात आले होते. 
याशिवाय एका नव्या साम्राज्याचाही सेट तयार करण्यात आला होता. हा सेट 500 जणांनी मिळून जवळपास 50 दिवसांमध्ये तयार केला होता. 
- बाहुबलीचे प्रोड्यूसर शोबूने सांगितले, 'रामोजीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि त्यांनी दिलेली आयडिया आम्हाला आवडली. सेट तयार करण्यासाठी आम्हाला एका महिन्यापेक्षा जास्त काळ लागला होता, आता टूरिस्ट हा सेट पाहू शकणार आहेत, याचा आम्हाला आनंद आहे.'
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय - काय आहे पाहाण्यासारखे... 
बातम्या आणखी आहेत...