आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरसोबत 'जग्गा जासूस'चे प्रमोशन करण्यास कॅटरीना अखेर तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर त्यांचा रिलीज होणारा पहिला चित्रपट म्हणजे जग्गा जासूस. या चित्रपटाचे शूटींग या दोघांच्या ब्रेकअपमुळे रखडले होते. पण आता या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. येत्या 14 जुलैला हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
 
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बऱ्याचवेळा रखडली गेली. पण आता चित्रपट पूर्ण झाल्यानंतर प्रमोशनसाठी रणबीर-कॅटरीना एकत्र येणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अगोदर रणबीरसोबत प्रमोशनसाठी जाण्यास तयार नसलेल्या कॅटरीनाने तिचा निर्णय बदलला आहे. 
 
रणबीरला कॅटरीनासोबत चित्रपटाचे प्रमोशन करणार का? असा सवाल एका पत्रकाराने विचारला तेव्हा रणबीरने सांगितले, "या चित्रपटासाठी मी आणि कॅटरीनाने फार मेहनत घेतली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशनही सोबतच करणार आहोत."
 
रणबीरला नुकताच 'आउटस्टँडिंग एंटरटेनर ऑफ द ईयर' चा पुरस्कार मिळाला आहे.
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर 
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...