आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Anushka's Film Name Will Remain 'Bombay Velvet'

'बॉम्बे वेलवेट' मधील बॉम्बे शब्द राहणार कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अनेक निर्णयांना विरोध केलेला आहे. बोर्डाविरोधात त्यांनी मागे तक्रारदेखील केली होती. मात्र आगामी काळात ते सेन्सॉर बोर्डाविरोधात मवाळ भूमिका घेऊ शकतात. याला कारण देखील तसेच आहे. काही दिवसांपूर्वी कश्यप यांच्या 'बॉम्बे वेलवेट'या शीर्षकावर टांगती तलवार होती. आता सेन्सॉरने बॉम्बे नावावरील आक्षेप हटवत चित्रपटाचे पहिला ट्रेलर पास केला आहे.
सेन्सॉर बोर्डाशी संबंधित एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, '1960 मधील मुंबईवर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे शहराचे नाव मुंबई ठेवण्याच्या 1995 मध्ये महाराष्ट सरकारने घेतलेला नियम या चित्रपटाला लागू होत नाही. त्यामुळे केवळ या चित्रपटासाठी आम्ही बॉम्बे शब्दावरील आक्षेप हटवला.'
दरम्यान 'बॉम्बे वेलवेट'च्या ट्रेलरमध्ये अनुष्का आणि रणबीरमध्ये चित्रीकरण करण्यात आलेली दोन चुंबन दृश्ये हटवण्यात आली आहेत. सूत्राने सांगितले की, 'चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र मिळाले असल्याने या दृश्यांवर कात्री लावण्यात आली. जर चित्रपटास प्रमाणपत्र घेण्यास निर्माते तयार झाले असते तर चित्रपटामध्ये चुंबन दृश्यांचा समावेश करता आला असता.'