आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir, Deepika To Return Rs 15 Crores To \'Tamasha\' Producers

\'तमाशा\' तोट्यात; रणबीर- दीपिकाने परत केले 15 कोटी रुपये!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक इम्तियाज अलीचा "तमाशा' हा चित्रपट तोट्यात गेल्याने या चित्रपटात काम करणारी हिट जोडी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांनी चित्रपटाचे निर्माते यूटीव्ही आणि साजिद नाडियादवाला यांना 15 कोटी रुपये परत केले आहेत. गेल्या वर्षी इम्तियाजने रणबीर आणि दीपिका यांना घेऊन "तमाशा' हा चित्रपट केला.
या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगला व्यवसाय केला. मात्र, त्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाने जगभरात सुमारे 106 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मात्र, तरीही तमाशाच्या निर्मात्याचे चांगलेच नुकसान झाले. रणबीर आणि दीपिका यांचे अाधीचे सर्वच चित्रपट हिट झाले आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी दोघांना तगडे मानधन दिले. तसेच वितरकांना मोठ्या रकमेने हक्क विकण्यात आले. मात्र, चित्रपटाने अपेक्षित व्यवसाय केला नाही. त्यामुळे रणबीरने 10 कोटी, तर दीपिकाने 5 कोटी रुपये साजिद नाडियादवाला यांना परत केले आहेत. त्यामुळे निर्माते चांगलेच सुखावले आहेत.