आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Deepika Travels By Train To Delhi To Promote Tamasha

TC ने मागितले रणबीर-दीपिकाकडे तिकीट, रेल्वेत असा झाला 'तमाशा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरचे बाँडिंग दिवसेंदिवस स्ट्राँग होत चालले आहे. आता रणबीर दीपिकाच्या इच्छेखातर चक्क रेल्वेने प्रवास करतोय. आपल्या आगामी 'तमाशा' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर आणि दीपिका चक्क रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. रविवारी संध्याकाळी 4 वाजता मुंबईहून ते सुविधा एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत दिग्दर्शक इम्तियाज अली दिसले.
रणबीर आणि दीपिकाने रेल्वेचा हा प्रवास एन्जॉय केला. यावेळी दीपिका नारळ पाणी पिताना दिसली. तर एका स्टेशनवर तिने चहाचा आस्वाद घेतला. टीसीने सामान्य प्रवाशांप्रमाणेच रणबीर, दीपिका आणि इम्तियाजचे तिकीट चेक केले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत प्रमोशनला जाताना रेल्वेने प्रवास करण्याची दीपिकाची इच्छा होती. ब-याच वर्षांपासून तिने रेल्वेचा प्रवास केला नव्हता. रणबीरला तिच्या इच्छेविषयी समजताच, त्याने तिची ही इच्छा पूर्ण केली.
दिल्लीत होणार पत्रकार परिषद
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत पोहोचल्यानंतर दोन्ही स्टार्स दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर तेथून ते चंदीगडला रवाना होतील. येथे प्रमोशन केल्यानंतर दोघे मुंबईत परततील.
दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित 'तमाशा' हा सिनेमा येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रणबीर-दीपिकाच्या रेल्वे प्रवासाचे निवडक फोटोज...