आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranbir Didn’T Interfere In Katrina Kaif Anurag Basu Fall Out Over 'Jagga Jasoos'

सेटवर कतरिनाला दिग्दर्शकाने खडसावले, रणबीरने घेतली बघ्याची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुराग बसु आणि रणबीर कपूरचा यांचा आधीपासूनच वादात अडकलेला 'जग्गा जासूस' आणखीच अडचणीत सापडत आहे.
कथितरित्या दिग्दर्शक बसु आणि सिनेमाची अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या तणाव निर्माण झाला आहे. यामागील कारण म्हणजे, सिनेमातील कतरिनाची भूमिका आणि तिची संभाव्य प्रतिक्रिया असल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणाशी निगडीत एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार, 'कतरिना नखरे दाखवणा-या अभिनेत्रींपैकी नाहीये. परंतु सुरुवातीपासूनच तिच्यात आणि दिग्दर्शकामध्ये सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोनात दूरावा आहे. हा दूराना रणबीरसुध्दा दूर करू शकला नाही.'
असेही स्पष्ट झाले, की एका सीन चुकीचा केल्याने अनुरागने सर्व यूनिटसमोर कतरिनाला खडसावले. तिथे उपस्थित एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार, 'अनुराग तिच्यावर ओरडला, मात्र तरीदेखील कतरिना तिथून गेली नाही. ती शांत झाल्यानंतर तिथून निघून गेली. रणबीरने या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. कतरिनाची मित्र अनुराग खडसावत असताना रणबीर केवळ पाहत होता.'