आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांची दादागिरी, फॅन आणि पत्रकाराला मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आर. के. स्‍टुडियोसमोरील गणेश विसर्जनाच्‍या कार्यक्रमात कपूर कुटुंबियांनी पत्रकार आणि एका फॅनला मारहाण केली आहे. वार्तांकनासाठी गेलेल्‍या एका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्‍या पत्रकाराला रणधीर कपूर यांनी जोरदार ढकलून दिले व मारहाण केली. तर, ऋषी कपूर यांनी एका फॅनला मारहाण केली.
आर. के. स्‍टुडियोसमोर दरवर्षी मोठ्या उत्‍साहात गणेशोत्‍सव साजरा होतो. कपूर कुटुंबिय येथे आवर्जून उपस्‍थित राहतात. मात्र, यंदा या उत्‍सवाला गालबोट लागले. एका वृत्‍तवाहिनीचे पत्रकार रणधिर कपूर यांची प्रतिक्रीया घेण्‍यासाठी गेले असता, रणधिर यांनी त्‍याला जोरदार धक्‍का दिला. तर, दुस-या घटनेत ऋषी कपूर यांनी एक फॅनला मारहाण केली आहे. कपूर कुटुंबियांची ही दादागिरी कॅमे-यात कैद झाली आहे. दुपारी 1 च्‍या सुमारास ही घटना घडली आहे.
या पत्रकाराला केली मारहाण..
ई 24 या वाहिनीच्‍या पत्रकाराला मारहाण झाली आहे. वाहिनीने दिलेल्‍या माहितीनुसार, आमचे रिपोर्टर कमल हुसेन यांना कपूर यांनी कानशिलात लगावली आहे. एवढ्यावरच रणधिर थांबले नाहीत तर, त्‍यांनी वार्ताहराला शिवीगाळ केल्‍याची माहितीही वाहिनीने दिली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, कपूर कुटुंबियांचेे उत्‍सवातील फोटो..
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, पत्रकाराला मारहाण केल्‍याचा व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...