आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुबेहूब संजय दत्तच्या लुकमध्ये दिसला रणबीर कपूर, पाहा ऑन लोकेशन PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय दत्तच्या बायोपिकच्या सेटवर रणबीर कपूरचा नवीन लुक समोर आलाय. यामध्ये रणबीर कपूर हुबेहूब संजय दत्त सारखा दिसतोय. रणबीरचे केस, दाढी-मिश्या सर्वच संजय सारखे दिसतेय. रणबीरची पर्सनॅलिटीसुध्दा संजय दत्त सारखीच दिसत आहे.

रणबीर कपूरचा संजयच्या लुकमधला फोटो फिल्मच्या शूटिंगच्या सेटवरुन समोर आलाय. फिल्मची शूटिंग सध्या मुंबईमध्ये सुरुये. यामध्ये रणबीर संजय दत्तच्या लुकमध्ये दिसतोय. सध्या त्याचा एकट्याचाच फोटो समोर आलाय. दुस-या अॅक्टर्सचा फोटो समोर आलेला नाही.

रणबीरच्या लुकसोबत बदलली चाल...
रणबीरने फिल्मसाठी फक्त लुक बदलला नाही तर आपली चालसुध्दा बदललीये. रणबीरने हूबेहूब संजय सारखे दिसण्यासाठी आपले 13 किलो वजन वाढवलेय. 
 
250 तासांपेक्षा जास्त पाहिले संजय दत्तचे फुटेज
- संजय दत्तच्या रंगात रंगण्यासाठी रणबीरने खुप मेहनत केलीये.
- यासोबतच संजयसारखी बॉडी बनवण्यासाठी रणबीर राणा दग्गुबतीचा फिटनेस ट्रेनर कुणाल गिरकडून ट्रेनिंग घेत आहे. यासोबत तो संजय दत्तचे ओल्ड फुटेजही पाहत आहे. रोलमध्ये कमतरता जाणवू नये यासाठी जवळपास 250 तासांचे फुटेज त्याने पाहिलेय. 
- रणबीरने मीट खाणे कमी केलेय. आता तो जास्त व्हेज खातोय. आता त्याला मीट खायचे असेल तर तो मासे खातो. घरचे मीट तो ड्रिंकसोबत खातो. विशेष म्हणजे आजी कृष्णा राजने बनवलेले असेल तर खातो.

राजकुमार हिरानी बनवत आहेत ही फिल्म...
- संजय दत्तच्या जीवनावर आधारित ही फिल्म राजकुमार हिरानी डायरेक्ट करत आहेत.
- फिल्मचे प्रोड्यूसर विधु विनोद चोपडा आहेत. सध्या फिल्म अनटाइटल्ड आहे.
- रिपोर्ट्सनुसार फिल्ममध्ये संजय दत्तच्या पत्नीचा रोल दीया मिर्जा करेल.
- संजय दत्तची आई नरगिसचा रोल मनीषा कोयराला करताना दिसेल.
- संजय दत्त या फिल्ममध्ये वडिल सुनील दत्तची भूमिका निभावू इच्छित होता. परंतु असे म्हटले जात आहे की परेश रावल ही भूमिका साकारतील.
- फिल्मची शूटिंग सुरु आहे. परंतु अजूनही याची रिलीज डेट अनाउंस झालेली नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, संजय दत्तच्या लुकमध्ये रणबीर कपूरचे PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...