आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE VIDEO + PICS : रणबीरने अनुष्कासाठी बनवला वडापाव !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरची धमालमस्ती बघा व्हिडिओमध्ये..)
मुंबईः अभिनेता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा स्टारर 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाची रिलीज डेट अगदी जवळ आली आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 15 मे रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अनुष्का आणि रणबीर यांनी Divyamarathi.com च्या मुंबई ऑफिसला भेट दिली होती. येथे हे दोघेही वडा पावचा स्टॉल बघून आश्चर्यचकित झाले. ही संधी आम्ही आमच्या हातून दवडली नाही. आम्ही रणबीर चक्क वडापाव बनवायला सांगितला. या पॅकेजमध्ये तुम्ही रणबीरला अनुष्कासाठी नाश्ता तयार करताना बघू शकता.
रणबीरने ब्रेडच्या एका फ्रेश पीसला ग्रीन आणि रेड चटणी लावून त्यामध्ये वडा ठेवला. यावेळी अनुष्काने रणबीरसोबतचे हे खास क्षण एन्जॉय केले.
रणबीर आणि अनुष्काचा आगामी 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमात 60 च्या दशकातील मुंबईचे दर्शन घडणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा Divyamarathi.comच्या ऑफिसमध्ये पोहोचलेल्या रणबीर आणि अनुष्काची खास छायाचित्रे...