आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'सारखा दोन भागांत बनू शकतो रणबीर स्टारर 'सुपरहीरो'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अयान मुखर्जी सध्या रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या डिटेक्टिव्ह सेटवर उपस्थित आहे. येथून तो त्याच्या आगामी सुपरहीरो सिनेमाचे प्लानिंग करत आहे. लंगोटिया यार रणबीरसोबत या सिनेमाचे प्लानिंग तू खूप दिवसांपासून करत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनी हा सिनेमा निर्मित करत आहे. या सिनेमाचे तीन भाग बनणार असल्याचे रणबीरला सांगण्यात आले आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'अयानने अलीकडेच दोन कथा करणला ऐकवल्या आहेत. एक लव्हस्टोरी असून दुसरा हा सुपरहीरो सिनेमा आहे. सुपरहीरो सिनेमासाठी मागील कथेंपेक्षा वेगळा प्रस्ताव अयानने तयार केला आहे. त्या अंतर्गत हे दोन भाग तयार होतील.'
दोन्ही भाग 'बाहुबली'सारखे आपसात जुळलेले असतील. मागील वर्षी आलेला 'बाहुबली: द बिगिनिंग' अशा पॉइंटवर संपला होता, की लोकांच्या मनात सिनेमाविषयी आजही उत्सूकता आहे. त्याची जोरदार चर्चा आणि जोक्स झाले होते. कटप्पा ने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी लोक प्रतिक्षा करत आहे. अयानलासुध्दा असेच यश संपादीत करायचे आहे. एक अट आहे, की धर्मा प्रॉडक्शनला दोन्ही सिनेमांचे बजेट एकदाच द्यावे लागणार आहे.
करणला ही कल्पना पसंत पडली असल्याचे सांगितल्या जात आहे. पहिल्या भागाविषयी बातचीत झाली आहे. लवकरच याविषयी निर्णय घेण्यात येईल, की लव्ह स्टोरी आधी बनेल की सुपरहीरो आधी. 'बाहुबली'ला करण जोहरने हिंदी प्रेक्षकांसाठी रिलीज केले होते.
रणबीर मागील बेशरम, रॉय, बॉम्बे वेलवेट, तमाशा या चार सिनेमांत अपयशी ठरला. आता त्याला जिगरी मित्र अयानवर विश्वास आहे. अयान सध्या त्याच्या आणि कतरिनाच्या नात्यात मध्यस्ती म्हणून काम करतोय.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, अनुराग बसुच्या डिटेक्टिव्ह सिनेमाच्या सेटवर उपस्थित आहे. रणबीरचे संतुलन बिघडू नये म्हणून अयान सेटवर उपस्थित असतो. या सिनेमात रणबीरने पैसे लावले आहेत, त्यामुळे हा सिनेमा महत्वपूर्ण आहे.
बातम्या आणखी आहेत...