आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटीमेट सीन शुट करताना रणबीरला वाटत होती लाज, ऐश्वर्या म्हणाली, प्रॉपर कर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: करण जोहरचा चित्रपट 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांची सिझलिंग केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे. पहिल्यांदा रणबीर (34) ने यावर मोकळेपणाने चर्चा केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला हे सीन शुट करताना लाज वाटत होती. मात्र ऐश्वर्या (42)ने त्याची हिम्मत वाढवली आणि सर्व सीन व्यवस्थीतपणे करण्याचा सल्ला दिला. रणबीर म्हणाला, मी घाबरलो होतो पण ऐश्वर्याने मला रागवून सर्व सीन शुट करून घेतले...

रणबीरने प्लॅनेट रेडियो सिटीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "इंटीमेट सीन करताना मी पुर्ण घाबरलो होतो. त्यानंतर ऐश्वर्याने मला रागावून सर्व सीन्स प्रॉपर्ली शुट करून घेतले. मग मी स्वतःला म्हणालो, की या संधीचा फायदा घ्यायला हवा. यासोबतच माझे दोन स्वप्न पुर्ण झाले. पहिले स्वप्न माधुरी दिक्षितसोबत काम करणे, जे 'ये जवानी है दीवानी' मध्ये पुर्ण झाले. आणि दुसरे स्वप्न म्हणजे ऐश्वर्यासोबत काम करणे, जे या चित्रपटाच्या माध्यमातून पुर्ण झाले."

गालाला स्पर्श करताच घाबरून जात होतो...
रणबीरने सांगितले की, "इंटीमेट सीन्स दरम्यान मला लाज वाटत होती, माझे हात कापत होते. कधी कधी तर मी त्यांच्या गालाला स्पर्श करायलाही घाबरत होतो. नंतर त्या म्हणाल्या, "तुला माझ्या सोबत काय प्रॉब्लेम आहे. आपण अभिनय करत आहोत. चल नीट कर.." मग मी विचार केला पुन्हा अशी संधी नाही मिळणार, त्यामुळे मी या संधीचे सोने केले.
या चित्रपटात ऐश्वर्या राय, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि फवाद खान मुख्य भुमिकेत आहेत.

जेव्हा "आ अब लौट चले" च्या सेटवर ऐश्वर्याला भेटला होता रणबीर
रणबीरने मुलाखतीत 'ऐ दिल है मुश्किल' च्या सेटवर ऐश्वर्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सुध्दा सांगितला. तो म्हणाला, "त्या वेळी मी 10वीत होतो. वडीलांचा चित्रपट "आ अब लौट चले" मध्ये ऐश्वर्या काम करत होती आणि मी असिस्टंट डायरेक्टर होतो. तेथे आमची मैत्री झाली. त्या वयात तुम्हीसुध्दा थोडे उत्साहीत झाला असता. तुम्हाला तेव्हा कळायला लागते की, मुलगी काय असते, प्रेम काय असते.."

पुढील स्लाईडवर पाहा, रणबीर आणि ऐश्वर्याच्या इंटीमेट सिन्सचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...