आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Said, 'I Have Not Shared Any Plan Of Marriage'

कतरिनासोबत लग्नाविषयी रणबीर म्हणाला, 'मी कोणतेही स्टेटमेंट दिलेले नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Divyamarathi.comच्या मुंबई ऑफिसमध्ये रणबीर कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत कतरिना कैफसोबतचे लग्नाचे प्लानिंग शेअर केल्याची बातमी अलीकडेच आली होती. मात्र स्वतः रणबीरने या गोष्टीचा इंकार केला आहे. Divyamarathi.comला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत रणबीरने सांगितले, "मीडिया गेल्या पाच वर्षांपासून माझ्या लग्नाचे प्लानिंग करत आहे. अनेकांनी तर मी लग्न करणार असल्याचे जाहिर केल्याचेही म्हटले आहे. मात्र सत्य हे आहे, की मी अद्याप कुठल्याही मीडिया हाऊसला माझ्या लग्नासंदर्भात कोणतेही स्टेटमेंट दिलेले नाही."
रणबीर आणि कतरिना कैफच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी साखरपुडा केला असल्याचीही बातमी चर्चेत होती. लंडनमध्ये दोघांनी आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याची ती बातमी होती. मात्र रणबीरने अद्याप साखरपुडा झाला नसल्याचे स्पष्ट केले.
रणबीर सध्या आपल्या आगामी 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचनिमित्ताने रणबीरने त्याची को-स्टार अनुष्का शर्मासोबत Divyamarathi.com च्या मुंबई ऑफिसला भेट दिली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रणबीर-अनुष्काची Divyamarathi.comच्या मुंबई ऑफिसमध्ये क्लिक झालेली छायाचित्रे...