आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅक्टिंगच्या वेडाने या फेमस अॅक्टरने गाठली होती मुंबई, आईला वाटले फिरुन परतेल घरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहीण अंजलीसोबत रणदीप हुड्डा - Divya Marathi
बहीण अंजलीसोबत रणदीप हुड्डा
 
रोहतकः रोहतक ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता रणदीप हुड्डा आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. अतिशय साध्या पद्धतीने अमृतसरमध्ये रणदीप यंदाचा वाढदिवस साजरा करणारेय. आईवडील, बहीण-भावोजी त्याच्यासोबत असतील. रणदीपच्या आई आशा हुड्डा यांनी सांगितले, की गोल्डन टेम्पलमध्ये दर्शन घेतल्यानंतर घरी एक छोटीशी पार्टी असेल. 

रणदीपच्या आईने divyamarathi.com कडे आपल्या मुलाचे काही निवडक सिक्रेट्स शेअर केले आहेत. 

- आशा हुड्डा यांनी सांगितले, ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर रणदीपने अभिनयासाठी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वाटले, तो काही दिवस मुंबई फिरेल आणि घरी परतेल. मात्र त्याचा मान्सून वेडिंग हा पहिला सिनेमा रिलीज झाला आणि आमचा विश्वास बसला, की तो अभिनयाच्या दुनियेतच नाव कमवेल. 
- बालपणीविषयीच्या आठवणींना उजाळा देताना आशा हुड्डा यांनी सांगितले, की रणदीप बालपणी अतिशय खट्याळ होता. 10 पर्यंतचे शिक्षण सोनीपतच्या राई स्पोर्ट्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर दिल्लीत बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला.
- ऑस्ट्रेलियात बिझनेस मॅनेजमेंटच्या शिक्षणासोबतच त्याने मॉडेलिंगला सुरुवात केली. 
- त्यानंतर भारतात परतल्यानंतर विविध ठिकाणी ऑडिशन्स दिल्या आणि नसीरुद्दीन शाह यांच्या एका प्ले ग्रुपसोबत जुळून मुंबईत नाटकांमधून काम केले. येथेच त्याने अभिनयात नशीब आजमावले. 

आजीच्या हातचा चुरमा आणि आईच्या हातची खीर आहे पसंत...
- रणदीपला त्याच्या आजी (वडिलांची आई)च्या हातचा चुरमा आणि आईच्या हातची खीर पसंत आहे. 
- आशा हुड्डा सांगतात, रणदीप मुंबईहून घरी आल्यानंतर त्यांना आवर्जुन खीर बनवायला सांगतो. तर 95 वर्षीय आजी नंदू देवी त्याच्यासाठी खास चुरमा बनवत असतात.

आईची इच्छा, मुलाने करावे लग्न...
- आशा हुड्डा सांगतात, की रणदीपने लग्न करावे, अशी माझी खूप इच्छा आहे. मात्र अद्याप तो लग्नसाठी तयार होत नाहीये. 

 रणदीपचे वडील आणि बहीण आहे डॉक्टर 
- रणदीपचे वडील रणबीर हुड्डा डॉक्टर तर आई शिक्षिका आहेत. 
- रणदीपला एक मोठी बहीण असून अजंली हे तिचे नाव आहे. अंजली डॉक्टर आणि भाऊ संदीप हुड्डा सिंगापूरच्या एका बँकेत व्हाइस प्रेसिडेंट आहे. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, रणदीप हुड्डाचे निवडक फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...