आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सुल्तान\'च्या शूटिंग सेटवर कोसळला रणदीप हुड्डा, दिल्लीत ऑपरेशन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षी ईदला रिलीज होणा-या 'सुल्तान'मध्ये रणदीप सलमानच्या प्रशिक्षकाच्या भूमिके दिसणार आहे. - Divya Marathi
यावर्षी ईदला रिलीज होणा-या 'सुल्तान'मध्ये रणदीप सलमानच्या प्रशिक्षकाच्या भूमिके दिसणार आहे.
नवी दिल्ली- सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता रणदीप हुड्डा सेटवर कोसळला. रविवारी (17 एप्रिल) त्याला अॅपेन्डिसचा त्रास होताच तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. राणदीप शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुल्तानमध्ये रणदीप सलमानच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आतापर्यंत त्रास सहन करून शूटिंग करत होता रणदीप ...
- रणदीप हुड्डा सध्या खूप बिझी आहे. त्याच्याकडे एकाचवेळी तीन सिनेमे आहेत.
- 'सुल्तान'शी निगडीत एका व्यक्तीने सांगितले, 'रणदीपला खूप दिवसांपासून याचा त्रास होतोय. परंतु बिझी शेड्यूलमुळे तो याकडे दुर्लक्ष करत होता.'
- तब्येत बिघडल्याने तो काही दिवस 'लाल रंग' सिनेमाचे प्रमोशन आणि 'सुल्तान'चे शूटिंग करू शकणार नाही.
- रणदीप सध्या तीन सिनेमांचे एकाचवेळी करतोय.
- त्याच्याकडे 'सुल्तान'शिवाय 'सरबजीत' आणि 'लाल रंग' हे दोन सिनेमे आहेत.
ईदच्या मुहूर्तावर होणार रिलीज...
- अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा आदित्य चोप्राने निर्मित केला आहे. - सिनेमात अनुष्का शर्मासुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहे.
- सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानचा सुल्तानमधील लूक...
बातम्या आणखी आहेत...