आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rani Mukerji And Aditya Chopra Blessed With A Baby Girl. She Has Been Named Adira

राणी मुखर्जी-आदित्य चोप्राला कन्यारत्न प्राप्ती, नाव ठेवले \'आदिरा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राणीने आज (9 डिसेंबर) सकाळी गोंडस मुलीला जन्म दिला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात राणीने बाळाला जन्म दिला. राणी आणि आदित्य चोप्रा या दाम्पत्यानी आपल्या लाडक्या लेकीचे नाव 'आदिरा' असे ठेवले आहे. आदिरा हे नाव आदित्य आणि राणी या नावाचे कॉम्बिनेशन आहे.
राणी मुखर्जीने बाळाच्या जन्मानंतर आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत म्हटले, ''मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानते. आज आम्हाला देवाने अदिराच्या रुपात एक अतिशय सुंदर गिफ्ट दिले आहे. आनंदाने आम्ही आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत.''
प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि राणी यांचे हे पहिले बाळ आहे. गेल्यावर्षी 24 एप्रिल रोजी राणी आणि आदित्य लग्नगाठीत अडकले होते.
आईवडील झाल्यानिमित्ताने राणी-आदित्यवर बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेक कलाकारांनी ट्विट करुन आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, रितेश देशमुख, परिणीती चोप्रा, करण जोहर, ऋषी कपूर यांनी केलेले ट्विट...
बातम्या आणखी आहेत...