आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक वर्षाची झाली राणी-आदित्यची लाडकी लेक, राणीने पहिल्यांदाच शेअर केला आदिराचा फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्रा यांनी नेहमीच आपल्या खासगी आयुष्याबाबत मौन बाळगले आहे. त्यांचे लग्न असो वा त्यांच्या मुलीचा 'आदिरा'चा जन्म.. त्यांनी कधीच मीडियासमोर पोझ केले नाही किंवा मुलीचा फोटोही अद्याप उघड केलेला नाही. मात्र त्यांची लाडकी कन्या 'आदिरा'चा आज (9 डिसेंबर) पहिला वाढदिवस असून त्या निमित्तानेच राणी मुखर्जीने तिला एक सुंदर पत्र लिहित त्या दोघींचा फोटोही शेअर केला आहे. यशराज फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे पत्र शेअर करण्यात आले असून त्यामध्ये राणी व झोपी गेलेल्या गोड आदिराचा फोटोही आहे. गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी मुंबईच्या ब्रीच कँण्डी रुग्णालयात राणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आदित्य आणि राणी दोघांच्या नावातील काही अक्षरे घेऊन त्यांनी आपल्या मुलीचे 'आदिरा' असे नामकरण केले.

राणीने काय लिहिले पत्रात...
या पत्रात राणी लिहिते, ‘माझं आदिरावर खूप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. त्याच्या जन्मानंतर माझं आयुष्य बदललं आहे. पण एका बाळाचं पालनपोषण करणं अतिशय कठीण काम आहे. कारण तुम्ही स्वत:साठी जगणं विसरुन जाता आणि तुमच्या बाळासाठी जगण्यास सुरुवात करता. बाळाने तुम्हाला आईच्या रुपात नवा जन्म दिला आहे. मी रात्री झोपू शकत नाही. दिवसाही मी झोपू शकत नाही. मी त्या सर्व मातांबद्दल विचार करते, ज्यांना मुलं आहेत. माझ्यासोबत जे होतंय ते त्यांच्यासोबतही होत असेल का? मी सर्व मातांना सलाम करते. आदिराचा माझ्यापोटी जन्म झाल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. मला माहित नाही, आयुष्याच्या या टप्प्यात कोणी मला समजून घेऊ शकतं की नाही. पण मी माझं आयुष्य जगत आहे. कोणत्याही भीतीशिवाय, शूरपणे, शिस्तीत आदिराला वाढवेन, अशी मला आशा आहे. सगळ्यांना तिचा अभिमान वाटावा, अशी माझी इच्छा आहे. दुसरं कोणी नसेल तरीही मला तिचा कायम अभिमान असेल.”
पुढील स्लाईडवर वाचा, राणीने आदिरासाठी लिहिले पत्र जसेच्या तसे... सोबतच बघा राणीचे लेटेस्ट फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...