आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर प्रथमच नवऱ्याबरोबर कार्यक्रमात दिसली राणी मुखर्जी, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राणी मुखर्जी आणि तिचा पती फिल्ममेकर आदित्य चोप्रा यांचा एकत्र फोटो सापडणे फार कठीण आहे. त्यामागचे कारण म्हणजे राणीला कॅमेऱ्याची सवय आणि आवड असली तरी आदित्य स्वतःला मात्र नेहमी पब्लिक अटेंशनपासून दूर ठेवत असतो. मात्र नुकतेच हे दोघे एका कार्यक्रमात सोबत असल्याचे काही फोटो मिळाले आहेत. राणी आणि आदित्य मित्रांबरोबर वांद्रे येथे फिरायला गेले होते, तेव्हाचे हे फोटो आहेत.
फोटोंमध्ये राणी मुखर्जी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तर आदित्य ब्लॅक कलरच्या कपड्यांत असलेले पाहायला मिळते. यापूर्वी राणी आणि आदित्य यांचा फोटो जुलै महिन्यात समोर आला होता. त्यावेळी यशराजचे टीम मेंबर बेफिक्रे चित्रपट प्रमोट करत होते.
नुकताच राणीने पोस्ट केला होता आदिराचा PHOTO
नुकताच राणीने तिची मुलगी आदिराच्या पहिल्या वाढदिवसाला तिच्याबरोबरचा फोटो शेयर केला होता. यशराज फिल्म्सच्या ऑफिशियल पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्यात राणीने एक इमोशनल नोटही लिहिलेली होती. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी 21 एप्रिल 2014 ला इटलीत एका कौटुंबीक सोहळ्यात लग्न केले होते. 9 डिसेंबर 2015 ला राणीने आदिराला जन्म दिला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, राणी आणि आदित्य चोप्राचे इतर काही PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...