आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट राणी मुखर्जी रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री राणी मुखर्जी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणी सध्या गर्भवती असून जानेवारी 2016 ला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून तिला अशक्तपणा आणि थकवा जाणवत होता. म्हणूनच तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर ती तेथेच राहणार आहे. अशक्तपणा आल्याने तिला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे.
आता तिच्या आरोग्यात सुधारणा झाली असून डॉक्टरांनी तिला घरी जाण्याची परवानगीही दिली, मात्र राणीच्या कुटुंबीयांनी तिला काही दिवस रूग्णालयातच राहण्याचा सल्ला दिला आहे. 21 एप्रिल 2014 रोजी निर्माता- दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यासह राणीने लग्न केले होते.