आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी कल्पना की खरचं होती राणी पद्मावती? फिल्मशी संबंधीत 5 वादांमागील काय आहे सत्य?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीलवाडा/चित्तोडगड - संजय लीला भंसाळीची फिल्म 'पद्मावती' सुरुवातीपासून वादग्रस्त ठरली आहे. फिल्मला शुटिंगपासून विरोध होत आला आहे, आता फिल्म प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तरीही वाद अद्याप शमलेला नाही. 


या फिल्ममध्ये चितौडची राणी पद्मिनीचा अपमान करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मेवाडसह संपूर्ण देशभरातून याविरोधात आवाज उठत आहे. विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे, की फिल्ममध्ये काही गोष्टी तथ्यहिन आहेत, वास्तवाशी त्यांचा काहीही संबंध नाही. करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांचे म्हणणे होते, की आम्ही 1 डिसेंबरला फिल्म रिलीज होऊ देणार नाही. ही जौहरची आग आहे, यात बरेच काही जळून राख होईल. या फिल्मवरुन सुरु असलेल्या वादावर DivyaMarathi.com ने इतिहासकार आणि इतिहासातील काही संदर्भ आणि प्रचलित कथांद्वारे सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

पद्मावती फिल्मबद्दल 5 वाद आणि काय आहे वास्तव 

 

1)काय खरच होती राणी पद्मावती ?
इतिहासकारांची मते आणि वेगवेगळ्या ग्रंथांमधून काही तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 
पद्मावती फक्त कल्पना नाही
- पद्मावतीबद्दल अनेकांची अनेक मतं आहेत. आतापर्यंत असे म्हटले जात होते की पद्मिनीचा उल्लेख सर्वात आधी मलिक मोहम्मद जायसीने त्याची रचना 'पद्मावत'मध्ये केला होता. मात्र इतिहास तपासला तर याशिवाय देखील काही तथ्य समोर येतात. इतिहासकारांचे म्हणणे आहे, की पद्मावती फक्त एक कल्पना नाही. 
- मीरा शोध संस्थानशी संबंधीत चितौडगडचे प्रोफेसर सत्यनारायण समदानी यांनी सांगितले, की जायसींची रचना 1540 सालाची आहे. जायसी हे सुफी विचारधारेचे होते आणि आजमेर दर्गा येथे आले होते. याच दौऱ्यात त्यांनी कवी बैन यांची कथा ऐकली, त्यामध्ये पद्मिनीचा उल्लेख होता. असेही म्हटले जाते की 'पद्मावत'मध्ये जायसीने कवी हेतमदान यांचे काव्य 'गोरा बादल' यातील काही अंश घेतले आहेत. 
छिताई चरित: जायसीच्या पद्मावत आधी 14वर्षांपूर्वी लिहिले गेले 
प्रो. समदानी सांगतात की 'छिताई चरित' हे ग्वाल्हेरचे कवी नारायणदास यांची रचना होती. या हस्तलिखिताचे संपादक ग्वाल्हेरचे हरिहरनाथ द्विवेदी आणि अगरचंद नाहटा यांनी याचा रचनाकाळ हा 1540 च्या आधीचा असल्याचे म्हटले आहे. अलाऊद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केले होते, त्याला देवगिरीच्या राजाची राणी पाहिजे होती.
-  'छिताई चरित'मध्ये म्हटले आहे, की देवगिरीवर आक्रमण केले तेव्हा अलाउद्दीने राघव चेतनला म्हणतो की मी चित्तौड मध्ये पद्मिनी असल्याचे ऐकले होते. तेथील राजा रतन सिंहला मी कैद केले, मात्र बादल त्याला सोडवून घेऊन गेला. 

 

2)जायसीने वास्तवाला काल्पनिकतेची जोड दिली का ? ​


जायसीने लिहिले- पद्मावती फार सुंदर होती, खिलजी तिच्यासाठी वेडा झाला...
- सुफी कवी मलिक मोहम्मद जायसी यांनी मुळ घटनेच्या सव्वा दोनशे वर्षांनंतर पद्मावत लिहिले होते. अनेक विद्वानांचे मत आहे की यात वास्तवासोबत कल्पनाविस्तारही मोठ्या प्रमाणात झाला होता. जायसीने लिहिले होते, पद्मावती खूप सुंदर होती. खिलजीने तिच्याबद्दल ऐकले तर तिला पाहाण्याची इच्छा झाली. खिलजीने चित्तौडला वेढा टाकला. रतनसिंहला संदेश पाठवला- पद्मावतीशी माझी भेट होऊ दे, चित्तौडला काहीही इजा न पोहोचवता मी परत जातो. रतनसिंहने राणीला सांगितले, राणी तयार झाली नाही. अखेर जौहर झाला. 

इतिहासकार मानतात... राणी पद्मावती होती, मात्र ...
इतिहास संशोधक आणि चित्तौड पीजी कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. ए.एल.जैन यांनी सांगितले, की देबारी येथे एक शिलालेख सापडला होता, त्यावर 1359 माघ पंचमी बुधवार लिहिले आहे. त्यावर रतन सिंहाच उल्लेख आहे. सुल्तान आणि पद्मिनीसोबत रतनसिंहची कथा संपूर्ण मध्यकाळात प्रचलित होती. 
- चित्तौडगडचे जौहर स्मृती संस्थानशी संबंधीत नरपतसिंह भाटी सांगतात, - राणी पद्मावतीला खिलजी आरशात पाहातो, हे धादांत खोटे आहे. त्या काळात काच आणि आरसा कुठून होता? त्यांच्यात प्रेमप्रसंग दृष्य कसे काय दाखवले जाऊ शकतात? 

 

3)खिलजी हिरो नव्हता. 
अशा व्यक्तीला नायकाच्या भूमिकेत दाखवले जात आहे, जो हल्लेखोर होता. जौहर संस्थेचे कर्नल रणधीर सिंह म्हणाले- फिल्ममध्ये खिलजीला नायकत्व बहाल केलेले दिसते आणि पद्मिनी नायिका. दुसरीकडे रतनसिंहचे महत्त्वच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे. ही इतिहासाची मोडतोड आहे. अखेर एक हल्लेखोर नायक कसा असू शकतो? 
वास्तव : प्रो. सत्यनारायण समदानी सह चित्तौडचे इतर इतिहासकार मानतात की खिलजी कोणत्याही परिस्थितीत नायक असू शकत नाही. छिताई चरितमध्ये उल्लेख आहे की त्याने रणथंभौर, चित्तौडगड आणि देवगिरीवर हल्ला फक्त यासाठी केला की आपल्या फौजेच्या बळावर या राज्यांतील महिला मिळवता येतील. खिलजीचे चरित्र चांगले नव्हते. इतिहासकारांचे मत आहे की आक्रमण करणाऱ्याला बळजबरीने नायक करण्याचा हा प्रयत्न आहे. 

 

4)घूमर नृत्य नाही, सन्मान. 
- फिल्ममध्ये दाखवण्यात आलेले गाणे घूमरमध्ये नृत्य दाखवण्यात आले आहे. यातील नायिका एका डांसर सारखी आहे. राजपुतांना हे कधीही मान्य होणार नाही. 
वास्तव : कर्नल सिंह आणि इतर राजपुत नेत्यांचे म्हणणे आहे, की घूमर संस्कृती, सन्मानाचे प्रतिक आहे. त्याचा इतिहासही फार दूरचा नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट महिला घुमर हे सर्वांसमोर विशेषतः पुरुषांसमोर करत नाही. हा कौटुंबिक सोहळ्यातील प्रकार आहे. एखादी राणी असे नृत्य करणे कधीही शक्य नाही. चित्रपटात संगीत-नृत्याच्या द्वारे राजस्थानच्या संस्कृती-इतिहासासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणत्या मुद्दांना आहे आक्षेप... 

बातम्या आणखी आहेत...