आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranjit Katyal Is Not Real In Airlift, Real Hero Is Sunny Mathews

#Airlift: रियाचा दावा, कुवैत रेस्क्यूचे खरे हीरो \'रणजीत\' नव्हे सनी मॅथ्यूज आहेत\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिया मॅथ्यूज, सनी मॅथ्यूज यांची नात. - Divya Marathi
रिया मॅथ्यूज, सनी मॅथ्यूज यांची नात.
नवी दिल्ली- 90च्या दशकात ईराकमध्ये झालेल्या युध्दादरम्यान कुवैतमधून बाहेर गेलेले भारतीयांवर आधारित 'एअरलिफ्ट'चे खरे हिरो रणजीत कात्याल नसून सनी मॅथ्यूज आणि वेदी आहेत. असा खुलासा सिनेमाचे दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन आणि सनी यांची नात रिया मॅथ्यूज यांनी केला आहे. अक्षय कुमारने रणजीत कात्याल यांची भूमिका साकारली आहे.
काय सांगितले सिनेमाच्या दिग्दर्शक आणि रियाने...?
- मेननने सांगितले, की ते जेव्हा सिनेमाविषयी संशोधन करत होते तेव्हा त्यांना सनी आणि वेदीविषयी माहित झाले.
- खरे काम सनी मॅथ्यूज यांनी केले होते असे समोर आले होते.
- या दोन लोकांची अन-ऑफिशिअर कमिटी बनवण्यात आली होती.
- दुसरीकडे रियानेसुध्दा याविषयी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.
- आधी रणजीत कात्याल यांची भूमिका फिक्शन मानली जात होती, परंतु खरे पाहता ही भूमिका या दोन लोकांच्या कामावर आधारित आहे.
एअरलिफ्टचा रणजीत कात्याल आहे काल्पनिक पात्र...
- अक्षय कुमारची रंजीत कात्याल ही भूमिका आधी काल्पनिक मानली जात होती.
- सिनेमाच्या या रेस्क्यूमध्ये रंजीतची मोठी भूमिका सांगण्यात आली आहे. मात्र यात काहीही सत्य नाहीये.
- या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारत सरकार आणि इंडियन एअरलाइन्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत होते.
- मात्र, एका मुलाखतीत अक्षयने रंजीतचे पात्र वास्तवीक असल्याचे सांगितले होते.
रिलीजच्या एका दिवसापूर्वी रियाने हा मॅसेज केला पोस्ट...
- रियाने लिहिले, 'आज एअरलिफ्ट रिलीज झाला आहे. हा सिनेमा 1990मध्ये ईराक युध्दादरम्यान सर्वात मोठ्या सिव्हिल इव्हॅक्युएशनवर (कुवैतमधील भारतीय) आधारित आहे. अक्षय कुमारची भूमिका माझ्या आजोबांसारख्या काही लोकांवर आधारित आहे. ज्यांनी एक लाख 70 हजार भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचे ऑपरेशन चालवले होते आणि त्यांची सुरक्षित घरवापसी केली होती. माझे आजोबा स्वत: प्राण धोक्यात टाकून तिथे थांबले आणि त्या लोकांना बाहेर पडण्यास मदत केली. ते एक महान व्यक्ती आहेत आणि त्यांनी यशाच्या माध्यमातून ह्यूमिनिटी, ग्रॅटीट्यूट आणि प्रेमावर जोर दिला. विशेषत: त्या लोकांसाठी जे भाग्यशाली नसतात. ते एक प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांनी अनेक लोकांच्या मनाला स्पर्श केला आणि इतरांसाठी आयुष्य जगले. माझीही इच्छा आहे, की मी त्यांच्या अर्धे काम करू शकू. त्यांच्याकडे जास्त आयुष्य नसले, तरी सिनेमांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी कायम राहतील आणि याचा मला नेहमी अभिमान राहिल.'
कुवैत एम्बेसीच्या एका अधिका-याने लिहिले होते सनीचे नाव...
- त्याकाळी कुवैतमध्ये इंडियन एम्बेसीचे ऑफिसर-इन-चार्ज अशोक कुमार सेनगुप्ता होते.
- त्यांनीसुध्दा एक इंग्रजी वर्तमानपत्रला दिलेल्या मुलाखतीत, सनी यांच्या भूमिकेचा खुलासा केला होता.
ही मुलाखतसुध्दा रियाने फेसबुकवर पोस्ट केली आहे...
- सेनगुप्ता यांनी सांगितले होते, 'सर्वात मोठे चॅलेंज 1,00,000 लोकांचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट बनवायचे होते. दिल्लीतून इव्हॅक्युएशनसाठी दोन विमान पाठवण्यात आले होते. जहाज पाठवण्यात आले होते, परंतु त्यांना पोहोचण्यासाठी वेळ लागला होता. लाखो लोक अडकले होते. मी रोडने रेस्क्यू करण्याची कल्पना करत होतो. सनी मॅथ्यूज खूपच रिसोर्सफुल इंडियन होते. कारण ते टोयटामध्ये काम करत होते. त्यांनी ईराकहून जॉर्डनकडे रोडने बाहेर निघण्यासाठी बस ऑपरेटर्स तयार केले होते. हे अंतर 2000 किमी होते. याचे एक कारण होते, की ईराकी आर्मी भारतीयांना टार्गेट करत नव्हते. कारण यामध्ये अनेक सैनिकांचे प्रशिक्षण भारतात झाले होते. तरीदेखील हा प्रवास खूप धोकादायक होता.'
काय अडचणी होत्या रेक्यूमध्ये...
- कुवैतमधून भारतीयांना बाहेर काढणे सोपे नव्हते. लोकांना आपल्या आयुष्यभराची कमाई सोडून भारतात जायचे नव्हते.
- ते त्यावेळी तेथील भयावह परिस्थितीला दुर्लक्षित करत होते आणि त्याच परिस्थितीत राहण्याची त्यांची तयारी होती.
- तसेच, काही लोकांकडे त्यांच्या इम्प्लॉयर्सने दिलेले प्रवासाचे वैध कागदपत्रेसुध्दा नव्हते.
- सोबतच कुवैतमध्ये रेक्यू ऑपरेशनचा धोका होता. म्हणून भारतीयांना जॉर्डन एअरपोर्टवर येण्यात सांगितले.
- कुवैतच्या विविध भागांत आलेले लोक अनेक दिवस जॉर्डनच्या शाळेत आणि इमारतीत थांबले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, रियाची भावूक पोस्ट आणि सेनगुप्ता यांच्या मुलाखतीचे पेपर कटींग...