आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होत आहे दीपिका रणवीरचा हा फोटो, रणवीर म्हणाला \'दीपिका आहे चांगली किसर\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रणवीर सिंहने नुकतेच नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये एक धक्कादायक स्टेटमेंट दिले आहे. दीपिका पादुकोण चांगली किसर असल्याचे रणवीरने म्हटले आहे. रणवीरने त्याच्या आणि दीपिकाच्या 'गोलियो की रासलीला: रामलीला' चा उल्लेख करताना म्हटले की, 'तुम्ही अंग लगा दे रे, मुझे रंग लगा दे रे हे गाणे पाहिले आहे का.' रणवीरच्या या बोल्ड स्टेटमेंटनंतर त्याचा आणि दीपिकाचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. 
 
रणवीरच्या एका फॅनने रणवीर-दीपिकाचा हा पोटो पोस्ट केला आहे. वॉगच्या एका जुन्या फोटोशूटमधील हा फोटो आहे. या फोटोमध्ये दोघे किस करताना दिसत आहेत. त्यानंतर दीपवीर अशा हॅशटॅगचे अनेक कमेंट्स येत आहेत. रणवीर आणि दिपिका 'गोलियो की रासलीला:रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी' मध्ये एकत्र झळकले आहेत. तसेच त्यांचा 'पद्मावती' हा चित्रपटही लवकरच येत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रणवीर आणि दीपिका यांचे काही PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...