आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally The Wait Is Over: Ranveer Deepika Priyanka Starrer \'Bajirao Mastani\' Trailer Out

VIDEO: \'बाजीराव मस्तानी\'चा भारदस्त ट्रेलर रिलीज, सारेच काही आहे लक्ष वेधून घेणारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ''इश्क.. जो तुफानी दरिया से बगावत कर जाए वो इश्क है... भरे दरबार में दुनिया से लड़ जाए वो इश्क है.. जो महबूब को देखे और खुदा को भूल जाए वो इश्क है..'' यासारखे भारदस्त डायलॉग आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहेत. नुकताच या सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज झालाय. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा स्टारर या सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आहेत.
रणवीर सिंहने ट्विटरवर सिनेमाचा ट्रेलर लाँच करुन ट्विट केले, "Ladies & gentlemen...Proudly presenting Sanjay Leela Bhansalis magnum opus....BAJIRAO MASTANI !!!!! http://bit.ly/BajiraoMastani_Trailer … #BajiraoMastani"
संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’मध्ये भव्य सेट पाहायला मिळतोय. हा ट्रेलर 3.45 मिनिटांचा आहे. या सिनेमात रणवीर सिंहने बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारली आहे. तर दीपिका पदुकोण मस्तानी आणि प्रियांका चोप्रा बाजीरावची पत्नी काशीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील सर्व कलाकारांचा लूक, परफॉर्मन्स, भव्य सेट लक्ष वेधून घेणारे आहेत. येत्या 18 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, 'बाजीराव मस्तानी'च्या ट्रेलरची खास झलक....