एन्टरटेन्मेंट डेस्कः सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलिवूड सिनेमा 'XXX'च्या शूटिंगच्या निमित्ताने टोरंटोमध्ये आहे. त्यामुळे तिचा प्रियकर आणि अभिनेता रणवीर सिंह याने तिला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सरप्राइज देण्याचे ठरवले आणि तो थेट तिच्याकडे पोहोचला. शनिवारी रणवीरने 'ट्रिपल एक्स द रिटर्न ऑफ एक्सजेंडर केज' या सिनेमाच्या सेटवर एन्ट्री घेतली आणि दीपिकाला सुखद धक्का दिला. सिनेमाचे दिग्दर्शक डी. जे. करुजो यांनी दोघांसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. रणवीरला बघताच आनंदी झाली दीपिका...
रणवीर-दीपिकासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करुन दिग्दर्शकाने लिहिले, "सेटवर स्पेशल विजिटर म्हणून रणवीर सिंहची एन्ट्री झाली. त्याला बघताच दीपिकाला अतिशय आनंद झाला."
गुरुवारी टोरंटोच्या स्थानिक पत्रकाराने रणवीरसोबतचे एक छायाचित्र शेअर केले होते. त्यावरुनच रणवीर येथे दीपिकासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी आला असल्याचे स्पष्ट झाले होते. फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...