आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मीही कास्टिंग काऊचचा बळी ठरलोय\' रणवीरने केला धक्कादायक खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणजे, रणवीर सिंह हा देखील बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचचा शिकार झाला होता. एका मुलाखतीत रणवीरने हा खुलासा केला आहे. रणवीरने सांगितले, की ही घटना त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात घडली होती.
काय म्हणाला रणवीर-
रणवीर म्हणाला, 'एका व्यक्तीने मला रात्री 8 वाजता अंधेरी स्थित घरी बोलावले. मी ठरलेल्या वेळी पोर्टफोलियो घेऊन तिथे पोहोचलो. परंतु त्याने पोर्टफोलियो न पाहता तो बाजूला ठेवला. नंतर मला कळाले, की त्याला काय हवे होते. मी नकार देताच त्याची नाराजी झाली.'
काय म्हणाला होता तो माणूस?
रणवीरच्या सांगण्यानुसार, त्या माणसाने पोर्टफोलियोला बाजूला ठेवला. त्यानंतर माझ्याकडे बघत तो म्हणाला, 'तू स्मार्ट हो, सेक्सी बन आणि स्मार्ट लोक खूप पुढे जातात. मी तुला या ऑफिसमध्ये पाठवेल. मी तुला कोणत्याही ऑफिसमध्ये पाठवेल. मग तू म्हणशील You Know...Take...touch'.
रणवीर म्हणतो, हे ऐकून मी थक्कच झालो. तो माझ्यासोबत निगोशिएशन करण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला होती, की काही करणार नाही फक्त बघेल.
पुढील स्लाईडवर वाचा, याबाबत काय म्हणाले इतर स्ट्रगलिंग अभिनेते....
बातम्या आणखी आहेत...