आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पद्मावती\'विरोधात जम्मूमध्ये निदर्शने, रणवीर म्हणाला - चित्रपट प्रदर्शित होणारच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. या चित्रपटाविरोधात आज (शनिवारी) जम्मूच्या स्थानिक राजपूत समुदायाने आंदोलन केले. केवळ पैसे कमावण्यासाठी राणी पद्मावतीच्या नावाचा वापर केला, असा आरोप जम्मूच्या राजपूत संघटनेने केला आहे. येथील राजपूत संघटनेचे प्रमुख नारायण सिंह यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. या संघटनेने हा चित्रपट जम्मूत प्रदर्शित होऊ देणार नसल्याची धमकी दिली आहे. 

 

रणवीरने तोडले मौन..

या चित्रपटात अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंहने या वादावर आपले मौन तोडले आहे. संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण यांना मिळालेल्या धमकीवर रणवीर म्हणाला, की मी चित्रपट आणि भन्साळींसोबत उभा आहे.  एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रणवीर म्हणाला, "मी 200 टक्के चित्रपटासोबत उभा आहे. मी भन्साळींकडे एक व्हिजन आहे. ते या चित्रपटाच्या रिलीजसाठी काहीही करतील.'


रणवीर पुढे म्हणाला, 'जे लोक याचा विरोध करत आहेत, त्यांना मी विनंती करतो, की त्यांनी सर्वप्रथम चित्रपट बघावा. संजय सरांवर शंका घेऊ नका. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. ते भारतीय संस्कृतीचा आदर करतात.'


पुढे वाचा, दीपिकासुद्धा म्हणाली, 'पद्मावती' प्रदर्शित होणारच...  

बातम्या आणखी आहेत...