आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh Celebrated Bajirao Peshwa\'s Birthday

PHOTOS: रणवीर सिंगने असा साजरा केला बाजीराव पेशव्यांचा वाढदिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा साजरा झाला वाढदिवस
श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या ३१५ व्या जयंती निमीत्त सिल्व्हर स्क्रीनवरच्या बाजीरावाने म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग आणि निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साली ह्यांनी बाजीराव पेशव्यांच्या दहाव्या आणि अकराव्या पिढीची भेट घेतली.
श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशव्यांचा जन्मदिवस १८ ऑगस्टला येतो. आणि त्यादिवशी पेशव्यांचे कुटूंब एकत्र येऊन त्यांचा वाढदिवस पूण्यात साजरा करतात. त्यामुळे 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साली ह्यांनी पेशव्यांच्या कुटूंबाला १७ तारखेला सोमवारी चित्रपटाच्या मुंबईमध्ये असलेल्या सेटवर बोलावले. आणि त्यांचा पाहूणचार केला.
ह्यावेळी चित्रपटाच्या सेटवर खास पेशवी थाट होता. श्रीमंत बाजीरावांचा वाढदिवस त्यांच्या आजच्या पिढीसोबत केक कापून साजरा करण्यात आला. ह्यावेळी दोन पध्दतीचे केक होते. एक एग-असलेला केक तर दूसरा एगलेस होता. श्रावण पाळणा-या आणि सोमवारी शाकाहार करणा-यांनी अर्थातच एगलेस केक खाल्ला. जेवण अस्सल पूणेरी मराठी आणि शाकाहारी पध्दतीचे होते.
बाजीराव पेशव्यांच्या दहाव्या आणि अकराव्या पिढीने संपूर्ण सेट पाहिला. त्यासोबतच रणवीर सोबत कुटूंबातल्या तरूणपिढीने सेल्फीही काढले. रणवीर आणि संजय लीला भन्सालींनी कुटूंबासोबत भरपूर गप्पा मारल्या. आणि त्यांचा चित्रपट दाखवण्याचेही आश्वासन दिले.
त्यासोबतच निघताना खास मराठी प्रथेप्रमाणे पेशव्यांच्या कुटूंबातल्या स्त्रियांना पैठणी साडी तर पुरूषांना शाल आणि श्रीफळ देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे कुटूंबाला पेशव्यांचे एक खास पेंटिंग भेट देण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाजीराव पेशव्यांचा कसा साजरा झाला वाढदिवस, त्याचे फोटो