आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर सिंहने ऑपरेशन थिएटरमधून केले Live Tweets

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणवीर सिंह)
मुंबई- बिनधास्त आणि मस्तीखोर स्वभावाचा अभिनेता रणवीर सिंह ऑपरेशन थिएटरमधून लाइव्ह टि्वट शेअर करताना दिसला. मागील दिवसांत संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी'च्या सेटवर जखमी झाल्यानंतर मुंबईच्या एका रुग्णालयात त्याला आपल्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. यावेळी रुग्णालया ऑपरेशन थिएटरमधून त्याने लाइव्ह टि्वट केले.
शनिवारी (4 एप्रिल) मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात सकाळी 8 वाजता रणवीर सिंह शस्त्रक्रिया करण्यासाठी गेला होता. त्याच्या उजव्या हाताच्या शस्त्रक्रिेयेचे लाइव्ह अपडेट चाहत्यांना टि्वटरवर दिले.
रणवीरने रुग्णालयातून तीन टि्वट केले, त्यामध्ये त्याने सुरुवातीला ऑपरेशन थिएटरमधील फोटो शेअर करून लिहिले, "Live tweet from the operation theatre !!"
रणवीरने दुस-या टि्वटमध्ये लिहिले, "About to get knocked out!"
रणवीरत्या तिस-या टि्वटमध्ये लिहिलेले होते, की "He injected my neck ! Whoa!!"
त्यानंतर त्याचे ऑपरेशन सुरु झाल्याने तो अपडेट देऊ शकला नाही. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी रणवीरला तीन आठवडे बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. आता तो मे महिन्यापूर्वी शूटिंग सुरु करू शकत नाही.
'बाजीराव मस्तानी'च्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्यानंतर रणवीरची फिजियोथेरपी करण्यात आली होती. परंतु त्याला आराम मिळाला नाही. अखेर शनिवारी (4 एप्रिल) सकाळी हिंदुजा रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जखमी झालेल्या रणवीरचे फोटो...