आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh Locked Himself In Room For 3 Weeks To Become \'Bajirao\'

Interview: \'बाजीराव\' होण्यासाठी स्वत:ला तीन आठवडे खोलीत कोंडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने भोपाळमध्ये 'बाजीराव मस्तानी' आगामी सिनेमाचे नवीन गाणे 'मल्हारी'चे ग्रँड लाँचिंग केले. यावेळी रणवीरने divyamarathi.comसोबत खास बातचीत केली. त्याच्या बातचीतचे काही अंश...
रिअल लाइफमध्ये तुझी प्रतिमा खूपच मजेशीर, quirky आहे, बाजीरावसाठी स्वत:ला खूप बदलावे लागले?
मी शूट सुरु होण्यापूर्वी स्वत: तीन आठवडे एका खोलीत बंद केले होते. आयसोलेशनमध्ये गेलो होतो. फोनो वापरला नाही. मित्र, कुटुंबीयांना भेटणे बंद केले. मला माहित होते, की हे खूपच इंटेन्सिव्ह कॅरेक्टर असणार आहे. मला खूपच वेगळे दिसावे लागणार होते आणि अभिनयही तसाच हवा होता. रणवीरपासून दूर होऊन बाजीरावकडे वाटचाल करायची होती.
सिनेमासाठी तुला Bald व्हावे लागले? किती कठिण होतो असे करणे?
माझ्यासाठी मूळीच कठिण नव्हते. मी भूमिकेसाठी काहीही करू शकतो. नरेशनवेळीच माहित झाले होते, की मला टक्कल कराव लागणार आहे. मी त्यावेळीच ठरवले होते, की प्रोस्थेटिक्स वापरणार नाही. मला भूमिकेला रिअल टच द्यायचा होता. जास्तित जास्त बाजीरावसारखे दिसायचे होते. असे करण्यासाठी मला कोणतीच अडचण आली नाही.
दीपिकाची तुझ्या Bald लूकवर काय प्रतिक्रिया होती?
तिला माझा हा लूक खूप आवडला.
मस्तानीच्या रुपात जेव्हा दीपिका तुझ्या समोर आली तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती?
ती खूप सुंदर आहे, जेव्हा ती समोर येते, तेव्हा पाच मिनीट तिच्यावरून नजर हटत नाही. मस्तानीच्या रुपात ती खूपच सुंदर दिसली. तिच्या लूकवर डिझाइनर अंजू मोदीने खूप काम केले. हेअर मेक-अपसाठी इंटरनॅशनल टीम आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रणवीरचे निवडक फोटो ...