आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर अशी करत आहे गर्लफ्रेंड दीपिकाची सुरक्षा, पोलिसांही राहातात सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका आणि रणवीर सिंह झोया अख्तरच्या घराबाहेर. - Divya Marathi
दीपिका आणि रणवीर सिंह झोया अख्तरच्या घराबाहेर.

मुंबई - दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेला 'पद्मावती' वादात अडकला असून केव्हा रिलीज होईल हे सांगणेही अवघड झाले आहे. 'पद्मावती'च्या वादानंतर फिल्मचे डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांना जीवे मारण्याची तर दीपाकाला नाक छाटण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर भन्साळींसह दीपिका आणि रणवीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या धमकी सत्रानंतर दिपीका आणि रणवीर शुक्रवारी मुंबईत एकत्र दिसले. डायरेक्टर झोया अख्तरच्या घराबाहेर दोघे स्पॉट झाले. यावेळी रणवीर त्याची गर्लफ्रेंड दीपिकाच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसला. झोया अख्तरच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दीपिकाला कारपर्यंत सोडण्यासाठी तो गेला होता. यावेळी मुंबई पोलिसही दीपिकासोबत होते. 

 

दीपिकाच्या सुरक्षेत मुंबई पोलिस... 
- मुंबई पोलिसांना दीपिकाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दीपिकाला धमकी मिळाल्यापासून पोलिस सतत तिच्या मागे पुढे दिसत आहेत. दीपिका घरातून बाहेर पडल्यानंतर पोलिस तिला फॉलो करत असतात. 
- दीपिका जीमसाठी घरातून बाहेर पडते तेव्हाही तिच्या सुरक्षेसाठी पोलिस तिच्या सोबत असतात. 
- सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका जिमध्ये वर्कआउट करत असताना दोन पोलिस जिमच्या आतमध्येच उपस्थित राहातात. 
- दीपिकाला एवढी सुरक्षा यासाठी पुरवण्यात येत आहे कारण काही राजकारण्यांनी तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली आहे. 

 

करणी सेनेने दिली नाक कापण्याची धमकी 
- राजस्थानमधील राजपूत करणी सेनेने दीपिकाला नाक कापण्याची धमकी दिली आहे. 
- रिपोर्ट्सनुसार, करणी सेनेचे महिपाल मकराना म्हणाले होते, की राजपूत कधी महिलांवर हात उचलत नाही, मात्र गरज पडली तर आम्ही दीपिकाचे ते हाल करु जे लक्ष्मणाने सूर्पणखाचे केले होते. 
- रामायणात सांगितल्यानुसार, लक्ष्मणाने रावणाची बहीण सूर्पणखाचे नाक छाटले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुरक्षा कवचात फिरते दीपिका.. 

बातम्या आणखी आहेत...