आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फक्त अमिताभ, ऋषीतच नाही तर आमच्यातही दम आहे...\', बघा ओम पुरींची आठवणीतील छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 66 वर्षाचे होते. ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अवघ्या बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ओम पुरी बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांनी व्यवसायिक तसेच प्रायोगिक सिनेमांमध्ये  यश मिळवले. ओम पुरी यांनी हॉलिवूडमध्येही काम केले. 1980 मध्ये आलेला 'आक्रोश' त्यांच्या सिनेकरिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक हिट सिनेमे केले. एखाद्या हिरोसारखी चेहरेपट्टी नसतानाही त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. अर्ध सत्य, जाने भी दो यारो, नसूर, मेरे बाप पहले आप, देल्ली सिक्स, मालामाल वीकली, डॉन, रंग दे बसंती, दीवाने हुए पागल, क्यू! हो गया ना, काश आप हमारे होते आणि प्यार दिवाना होता है अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.
 
 
अमिताभ-ऋषीपेक्षा आम्ही कमी नाहीत... 
एका मुलाखतीत ओम पुरी म्हणाले होते, "चरित्र भूमिकांसाठी निर्मात्यांची पहिली पसंती अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांना असली तरी आमच्यातही दम आहे.  व्यावसायिक सिनेमांच्या निर्मात्यांना पैसे कमवायचे आहेत, त्यामुळेच कदाचित कॅरेक्टर भूमिकांसाठी ते स्टार्सला घेऊ इच्छितात. मी आणि नसीरुद्दीन शाह स्टार नाहीत. बच्चन आणि ऋषी कपूर स्टार आहेत. मात्र नसीर, अनुपम खेर, परेश रावल आणि माझ्यात क्षमता आहे. पण आम्हाला  कमी लेखले जाऊ नये.  

मी आणि नसीर सर्वात क्वॉलिफाइड अॅक्टर्स
ओम पुरी पुढे म्हणाले होते, "मी आणि नसीरुद्दीन शाह फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात क्वॉलिफाइड अॅक्टर्स आहेत. नक्कीच आम्हाला नाच-गाणी येत नाहीत. मात्र अभिनयाचे आम्ही विधिवत शिक्षण घेतले आहे."
 
एका मुलाखतीत ओम पुरी म्हणाले होते, की  'अमिताभ बच्चन महान अभिनेते आहेत. मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी  'अर्ध सत्य' सिनेमा नाकारला होता.'
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, ओम पुरी यांच्या कारकिर्दीविषयी आणि सोबतच बघा, त्यांची आठवणीतील छायाचित्रे....
  
बातम्या आणखी आहेत...