आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडील, सासू-सास-यांपासून ते नातूपर्यंत, हे आहेत हेमा मालिनी यांचे फॅमिली मेंबर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: (डावीकडे)  आई जया चक्रवर्ती, वडील वी.एस रामानुजम चक्रवर्तीसोबत हेमा मालिनी. (उजवीकडे) धर्मेंद्र यांचे वडील केवल कृष्ण सिंह देओल आणि मुलगी विजेता. - Divya Marathi
फाइल फोटो: (डावीकडे) आई जया चक्रवर्ती, वडील वी.एस रामानुजम चक्रवर्तीसोबत हेमा मालिनी. (उजवीकडे) धर्मेंद्र यांचे वडील केवल कृष्ण सिंह देओल आणि मुलगी विजेता.
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज (16 ऑक्टोबर) वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 ऑक्टोबर 1948 रोजी तामिळनाडू येथील अम्मनकुडी येथे जन्मलेल्या हेमा यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. वयाच्या केवळ 15 व्या वर्षी त्यांनी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता.
हेमा यांच्या मातोश्री जया चक्रवर्ती या सिनेनिर्मात्या तर वडील वी.एस. रामानुजम चक्रवर्ती सरकारी नोकरीत होते. हेमा यांना दोन भाऊ असून कन्नन आणि रगुनाथ चक्रवर्ती ही त्यांची नावे आहेत. हेमा आपल्या दोन्ही भावांच्या खूप जवळ आहेत.
हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'शोले' (1975) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हेमा आणि धर्मेंद्र यांचे सूत जुळले. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. हिंदू परंपरेनुसार, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता ते हेमासोबत लग्न करु शकत नव्हते. त्यावर तोडगा म्हणून हेमा आणि धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तन करुन एकमेकांना आयुष्याचा जोडीदार बनवले. अनेक वादांना तोंड देत 21 ऑगस्ट 1979 रोजी दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर आणि वडील केवल कृष्ण सिंह देओल हेमा यांचे सासू-सासरे झाले.
हेमा आणि धर्मेंद्र यांना दोन मुली असून ईशा आणि अहाना ही त्यांची नावे आहेत. सिनेसृष्टीत ईशा देओलला फारसे यश मिळाले नाही. 2012 मध्ये तिचे बिझनेसमन भरत तख्तानीसोबत लग्न झाले. तर धाकटी कन्या अहाना हिचे 2014 रोजी वैभव वोहरासोबत लग्न झाले. या दोघांचा एक मुलगा आहे. हेमा यांच्या नातूचे नाव डेरियन वोहरा आहे.
पुढे पाहा, हेमा मालिनी यांच्या फॅमिली मेंबर्सची छायाचित्रे...