आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl : 52 वर्षांचा झालेल्या आमिर खानचे Rare Photos, वाचा पडद्यामागील गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः अभिनेता आमिर खानने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 मार्च 1965 रोजी मुंबईत जन्मलेला आमिर अभिनेता होण्यापूर्वी टेनिस प्लेअर होता. अनेक राज्यस्तरीय चॅम्पिअनशिपमध्ये आमिर सहभागी झाला होता. अंडर 12-14 या ग्रुपमध्ये तो चॅम्पिअन राहिला आहे. वडील ताहिर हुसैन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की आमिर राष्ट्रीयस्तरावरसुद्धा टेनिस खेळला आहे.  
 
कसा सुरु झाला सुपरस्टार होण्याचा प्रवास... 
- टीनएजर असताना आमिरने  FTII (फिल्म अँड टेलिव्हिजिन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया) मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचकाळात ही संस्था सुरु झाली होती. 
- त्यावेळी आमिरला त्याच्या वडिलांनी परवानगी दिली नव्हती. कारण त्याने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे असे, त्याच्या वडिलांचे म्हणणे होते. 
- ताहिर हुसैन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की त्यांनी आमिरला नकार दिल्यानंतर त्याने त्यांच्याशी वाद घातला होता. आमिर त्यांना म्हणाला होता, ज्याला डॉक्टर व्हायचे आहे, तो मेडिकल कॉलेजमध्ये जातो. मला दिग्दर्शक व्हायचे आहे, त्यामुळे मला FTII मध्ये प्रवेश घेण्याची परवानगी द्या. 
- आमिरने त्यांना सांगितले होते, की ती खूप चांगली संस्था असून सरकारकडून त्याला परवानगी मिळाली आहे.
- FTII मध्ये प्रवेश घेण्याऐवजी आमिरने त्याचे काका नासिर हुसैन यांना असिस्ट करुन दिग्दर्शनातील बारकावे शिकावे, असा सल्ला ताहिर हुसैन यांनी आमिरला दिला होता. 
- आमिरने आपल्या वडिलांचा सल्ला ऐकला आणि नासिर यांच्यासोबत 'मंजिल मंजिल' (1984) आणि 'जबरदस्त' या सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली. 
- त्यापूर्वी आमिरने आदित्य भट्टाचार्य यांच्या 'Paranoia' (1983) या शॉर्ट फिल्मसाठीही सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. 
 
आमिर कसा बनला अभिनेता...
- आमिरने वयाच्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय केला होता. नासिर हुसैन यांच्या यादों की बारात या सिनेमात आमिर बालकलाकार म्हणून झळकला होता. 
- वयाच्या 18 व्या वर्षी आमिर सुबह सुबह या सिनेमात झळकला होता. मात्र FTII चा ही डिप्लोमा फिल्म काही कारणास्तव रिलीज होऊ शकली नव्हती. याच काळात केतन मेहता यांची नजर आमिरवर पडली आणि त्यांनी त्याला होली या सिनेमासाठी साइन केले. 
- होली हा सिनेमा 1984 साली रिलीज झाला. या सिनेमात आमिर हुसैन खान असे त्याचे नाव क्रेडिट लाइनमध्ये लिहून आले होते. हे आमिरचे पूर्ण नाव आहे. 
- 1988 मध्ये आमिर त्याचा चुलत भाऊ मन्सूर खान दिग्दर्शित कयामत से कयामत तक या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकला. हाच त्याचा पहिला सुपरहिट सिनेमा आहे. या सिनेमाने आमिरला एका रात्रीत सुपरस्टार पद बहाल केले. 
- खास गोष्ट म्हणजे, या सिनेमात बजेट खूप कमी होते. त्यामुळे लीड अॅक्टर असलेल्या आमिरने त्याचा मित्र राज जुत्सीसोबत मिळून बस आणि ऑटोवर सिनेमाचे पोस्टर्स चिकटवण्याचे काम केले होते. 
- इतकेच नाही तर आमिर स्वतः लोकांना सांगायचा, की मी या सिनेमाचा हीरो आहे. 
- 'कयामत से कयामत तक' या सिनेमासाठी आमिरला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. 

वर्षाला आमिरने केले आहेत पाच सिनेमे... त्याच्याविषयी अशाच आणखी काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर.... 
बातम्या आणखी आहेत...