आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rati Agnihorti Reveals More Horrifying Details Of Her Marriage Nightmare

रती अग्निहोत्री घेणार घटस्फोट, पतीच्या जाचाला कंटाळून घेतला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रती अग्निहोत्री)
मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. उद्योजक असलेले रती अग्निहोत्री यांचे पती त्यांना मारहाण करत असल्याची ती तक्रार होती.
आता रती यांनी पतीच्या या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी घटस्फोट घ्यायचे ठरवले आहे. मुलगा तनुज पुण्यात एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असताना व आई ब्रेन स्ट्रोकमुळे पुण्यातच रुग्णालयात दाखल असताना घरी एकटे असताना नवऱ्यामुळे जिवाला धोका निर्माण होईल, अशी वागणूक व मारहाण केल्याने कधी ना कधी त्यामुळे मृत्यू येईल अशी भीती 54 वर्षीय रती यांना वाटते आहे. त्यामुळे त्यांनी हा घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.