आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raveena Tandon Opposed The Aamir Khan's Statement On Intolerance

आमिरच्या विरोधात बोलली रवीना, 'मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला, तेव्हा भिती वाटली नाही?'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. असहिष्णुताच्या मुद्यावर आमिरने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे. राजकाण्यांपासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत आमिरच्या वक्तव्यावर सर्वत्र टिका होत आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेसुध्दा आमिरच्या स्टेटमेंटचा विरोध केला आहे. तिने मायक्रोब्लॉगिंग साइट्सच्या माध्यमातून आमिरवर तीव्र हल्ला केला आहे. तिच्या सांगण्यानुसार, ते सर्व लोक, ज्यांना वाटत नव्हते की नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावे. सरकारला खाली पाडण्याचा त्यांना विचार होता. दु:खद गोष्ट आहे, की राजकारणासाठी ते देशाला लाजीरवाणे करत आहेत. रवीनाने आपल्या टि्वट्समध्ये सांगितले आहे, की कोणता ना कोणता मुद्दा नेहमी राहिल आणि कुणी ना कुणी त्यावर आवाज उठवणारा असेल. परंतु त्यावर वाद घालणे मुर्खपणा आहे. इतकेच नव्हे रवीना असही म्हणाली, की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा ही भिती तेव्हा कुठे होती.
खुलेआम सांगा पंतप्रधान म्हणून मोदी पसंत नाहीत-
रवीनाने आपल्या टि्वट्समध्ये एका आव्हानसुध्दा दिले आहे. ती म्हणाली, की असे लोक देशाला मान खाली लावण्याऐवजी खुलेआम का सांगत नाहीत, की त्यांना पंतप्रधान म्हणून मोदी पसंत नाहीत. हिंमत असेल तर देशाला बदनाम करण्याऐवजी पुढे येऊन बोला. मला कोणत्याच प्रकारच्या निषेधाविषयी काहीच म्हणायचे नाहीये. परंतु देशाच्या सन्मानाविषयी बोलायचे झाले तर, देशाने तुमच्यासाठी काय केले, असा विचार करण्याऐवजी तुम्ही देशासाठी काय केले हा विचार करा.
काय आहे प्रकरण?
अभिनेता आमिर खानने देशात वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावर त्याने स्वत:चे मत मांडले. आमिर म्हणाला, की त्याच्या मुलांच्या सुरक्षतेतेसाठी त्याला पहिल्यांदा भिती वाटत आहे. सोमवारी रात्री (23 नोव्हेंबर) एका मीडया ग्रुपच्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आमिर म्हणाला, की देशातील वातावरण पाहून एकदा पत्नी किरणने खूप मोठी गोष्ट म्हटली होती. किरणने मला विचारले होते, की आपण हा देश सोडावा का? किरण मुलांच्या सुरक्षतेतेसाठी असे म्हणाली होती. त्याच्या या वक्तव्यामुळे आमिरवर सर्व देशभरातून टिका होत आहे.
काय आहे असहिष्णुतेचा मुद्दा?
उत्तरप्रदेशच्या दादरीमध्ये गोमांस ठेवल्याच्या शंकेने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी कन्नडी लेखक कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर असहिष्णुतेचा मुद्दा भडकला. या मुद्यावर पुरस्कार वापसीची सुरुवात झाली. अनेक लेखक, निर्माता आणि वैज्ञानिकांनी देशात वाढणा-या असहिष्णुतेचा विरोध दर्शवत पुरस्कार परत केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा रवीनाचे Tweets...