आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raveena Tandon\'s Younger Daughter Wedding On 25th January

रवीना टंडनच्या मुलीचे येत्या 25 जानेवारीला लग्न, हिंदू-ख्रिश्चन पद्धतीने अडकणार लग्नगाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवीनाने हे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. - Divya Marathi
रवीनाने हे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे.

मुंबईः रवीना टंडनची मुलगी छायाचे येत्या 25 जानेवारी रोजी लग्न आहे. छाया ही रवीनाने दत्तक घेतलेली मुलगी आहे. गोव्यात हा लग्नसोहळा पार पडणारेय. याची माहिती स्वतः रवीनाने ट्विटरच्या माध्यमातून दिली. तिने वरील छायाचित्र शेअर करुन लिहिले, "Off to goa for my younger ones wedding...going to be a hulla gulla week.... "
हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने होणार लग्न...
सूत्रांच्या माहितीनुसार, असिन आणि राहुल यांच्यानंतर छायाचेही लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने होणारेय. छायाचा भावी पती गोव्यातील आहे.
1990 च्या दशकात रवीनाने दोन मुलींना घेतले होते दत्तक...
रवीनाने 90 च्या दशकात दोन मुलींना दत्तक घेतले होते. यापैकी थोरली मुलगी पूजाचे लग्न 2011 मध्ये झाले. प्रसिद्ध चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत लग्न झाल्यानंतर रवीनाने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. रशा आणि रणबीरवर्धन ही तिच्या मुलांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रवीनाच्या चारही मुलांची छायाचित्रे...