आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षय कुमारला पहिली संधी देणारे निर्माते रवि श्रीवास्तव शेवटच्या श्वासापूर्वी म्हणाले, 'थँक यू अक्षय'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता अक्षय कुमारला फिल्म इंडस्ट्रीत पहिली संधी देणारे निर्माते रवि श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. बॉलिवूड भास्करने अलीकडेच प्रकाशित केलेल्या वृत्तात निर्माते रवि श्रीवास्तव यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत रवि श्रीवास्तव यांनी त्यांचा शेवटचा काळ काढला होता. उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याची बातमी आम्ही प्रकाशित केल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारच्या टीमने रवि यांची भेट घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अखेरचा श्वासापूर्वी रवि श्रीवास्तव यांनी अक्षय कुमारला धन्यवाद दिले. मोहसिन नावाची व्यक्ती शेवटच्या काळात त्यांची देखभाल करत होती. अंतिम काळात रुग्णालयाचा संपूर्ण खर्च अक्षय कुमारच्या टीमने उचलला होता.
रवि श्रीवास्तव यांची देखभाल करणारे मोहसिन खान यांच्याशी आम्ही बातचित केली असता, त्यांनी सांगितले, ' रविजींवर उपचार सुरु होते. अक्षय कुमारच्या टीमकडून आम्हाला खूप मदत मिळाली. मात्र हळूहळू त्यांचा वीकनेस वाढत चालला होता. 9 दिवस ते होली स्पिरिट हॉस्पिटल, अँधेरी (ईस्ट) मध्ये दाखल होते. मात्र देवाच्या मनात काही वेगळेच होते. दहाव्या दिवशी रवि साहेबांचे निधन झाले. त्यांनी मनापासून अक्षय कुमारला धन्यवाद म्हटले.'

आमच्या प्रतिनिधींनी रवि श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्याशी बातचित केली होती. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या होत्या. काय म्हणाल होते, रवि श्रीवास्तव वाचा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...