आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravina Tandan Criticized Salman Khan Over Hit And Run

सलमानच्या शिक्षेवर रविना टंडन म्हणाली- जो जे करेल, त्याचे परिणाम भोगावे लागतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हिट अॅंड रन प्रकरणी सलमान खानला झालेल्या पाच वर्षांच्या शिक्षेचे अभिनेत्री रविना टंडनने समर्थन केले आहे. सलमानला लक्ष्य करीत रविना म्हणाली, की जो जे करेल, त्याचे परिणाम भोगावे लागतील. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रविना म्हणाली, की ज्याने जे काम केले आहे, त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. देव सगळे बघत आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणारे आम्ही कुणीही नाहीत.
अनेक वेळा रविनाने केले आहे सलमानचे समर्थन
सलमान खानसोबत रविनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापूर्वी तिने अनेक वेळा सलमानचे समर्थन केले आहे. सलमानला शिक्षा झाली तेव्हा रविनाने त्याच्या समर्थनार्थ तीन प्रश्न विचारले होते. तिची सलमानसोबत चांगली मैत्री आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले होते, की सलमान खानसाठी माझ्या मनात खुप आदर आहे. तो माझा पहिला कोस्टार आहे. आम्ही पत्थर कें फुलमध्ये सोबत काम केले आहे. मला जेव्हा त्याची गरज भासली तेव्हा त्याने मला मदत केली आहे. 2003 मध्ये मी जेव्हा 'स्टंप्ड' चित्रपट केल्या तेव्हा त्याने त्यात आयटम सॉंग केले होते. त्याच्याजवळ सोन्यासारखे हृदय आहे.
शिक्षा झाल्यावरही सलमानच्या घरी गेली होती रविना
मुंबईच्या सेशन कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर रविना टंडन सलमानच्या घरी गेली होती. यावेळी ती सलमानसह त्याच्या कुटुंबीयांना भेटली होती. रविनाने सलमानसोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अंदाज अपना अपना, पत्थर के फूल, कहीं प्यार ना हो जाए आणि दीवाना मस्ताना या चित्रपटांमध्ये दोघांनी काम केले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, सलमानच्या शिक्षेवर रविनाने केलेल्या ट्विट्स...