आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reactions Of Sonam Kapoor,Kangana Ranaut,Sonakshi Sinha On My Choice

'माय चॉइस'वर सोनमची प्रतिक्रिया, 'आपले म्हणणे मांडण्यासाठी व्हिडिओ गरज नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री सोनम कपूर)
मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'माय चॉइस' व्हिडिओ खूप चर्चेत आहे. या व्हिडिओविषयी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कंगना राणावत आणि सोनाक्षी सिन्हा यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. या दोघींनंतर आता सोनम कपूरनेसुध्दा वक्तव्य केले आहे.
सोनमला जेव्हा दीपिकाच्या 'माय चॉइस'विषयी विचारले, तेव्हा तिने सांगितले, 'फेमिनिज्मविषयी नेहमीच एलिट महिलांचा विचार चुकीचा राहिला आहे. त्यांना वाटते, की पुरुषांना चांगले-वाईट म्हटल्यानंतर आणि त्यांचा तिरस्कार केल्यानंतरच फेमिनिस्ट टिकून राहते.'
सोनमने असेही सांगितले, की 'मला माझे म्हणणे मांडण्यासाठी व्हिडिओ गरज नाहीये. माझ्या अॅक्शनचा आवाजच बुलंद आहे. मला गर्व आहे, की मी एक महिला आहे. मी माझ्या स्वातंत्र्याचा सन्मान करते. मी कोणत्याच विषयावर माझे मत मांडण्यास घाबरत नाही.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कंगना राणावत आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या या व्हिडिओवरील प्रतिक्रिया...