आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiya Khan\'s Last Letter To Boyfriend Suraj Pancholi

Must Read: समोर आले जिया खानचे सूरज पंचोलीला लिहिलेले शेवटचे पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री नफिसा खान अर्थातच जिया खानचा मृत्यू 3 जून 2013ला झाला. त्यानंतर अनेक प्रकरण समोर आली. बातम्यांनुसार, तिच्या मृत्यूचे कारण बॉयफ्रेंड आणि अभिनेचा सूरज पांचोली आहे. त्यानंतर सूरजवरसुध्दा तक्रार दाखल झाली. अलीकडेच जियाने लिहिले एक पत्र समोर आले आहे. हे तिचे शेवटचे पत्र असून तिने ते बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला लिहिले होते. हे पत्र अतिशय वेदनादायी शब्दांत लिहिले आहे. जिया आणि सूरज पांचोली यांच्यात अनेक वर्षे प्रेमसंबंध होते. आत्महत्या करण्यापूर्वी जियाने सूरजला शेवटचा फोन केला होता. 
 
जियाच्या निधनाची छायाचित्रे तिच्या वकिलांनी चार महिन्यानंतर पहिल्यांदा मीडियासमोर आणली होती. ही छायाचित्रे पाहून  जियाचे वकील दिनेश तिवारी आणि कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिले होते, की जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे. मात्र या प्रकरणाचा जेव्हा-जेव्हा ये उल्लेख होईल तेव्हा-तेव्हा सूरज पांचोलीचे नाव घेतले जाईल हे मात्र नक्की. 
 
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी म्हणजे 3 जून 2013 रोजी जियाने या जगाचा निरोप घेतला. मुंबईतील आपल्या राहत्या घरी जिया छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. जियाच्या अकाली निधनाने संपूर्ण बॉलिवूड स्तब्ध झाले होते.  
 
जिया उर्फ नफिसा खानचे वडील अली रिजवी भारतीय वंशाचे तर आई अमेरिकन नागरिक आहे. जियाची आई राबिया अमीन स्वतः एक अभिनेत्री आहेत.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा जियाने बॉयफ्रेंड सूरजला लिहिले पत्र...