आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recall: Amitabh Bachchan 1982 Injury While Filming 'Coolie'

या अपघातात Big B चे यकृत झाले डॅमेज, 'कुली'च्या शूटिंगवेळी बसला होता जबर मार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांनी यांनी अलीकडेच आपल्या तब्बेतीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. माझे यकृत 75 टक्के निकामी झाले असल्याची अतिशय गंभीर माहिती त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. त्यांनी सांगितले, केवळ 25 टक्के यकृतावर मी आयुष्य जगतोय. मला हेपटाइटिस बी हा आजार आहे. 2000 साली मला या आजाराबद्दल कळले. त्यावेळी नियमित तपासणीसाठी मी गेलो होतो. तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले, की माझे 75 टक्के यकृत हे निकामी झाले आहे.
कसा झाला हा आजार?
आपले यकृत कशामुळे निकामी होत चालले आहे याबाबतची माहिती देताना 73 वर्षीय अमिताभ म्हणाले, आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की 1982 साली 'कुली' चित्रपटाचे शुटिंग करताना मी गंभीर जखमी झालो होतो. त्यावेळी माझ्या शरीरात 200 लोकांचे 60 बॉटल रक्त चढवले गेले होते. त्यातील एका व्यक्तीला हेपेटायसीस-बी ग्रस्त होते. त्याच्या रक्तातील जंतूमुळे मलाही या रोगाचा संसर्ग झाला. याबाबतची माहिती मला 18 वर्षानंतर म्हणजेच 2000 साली अनेक तपासण्यानंतर समजली. आता मी 73 वर्षाचा झालो आहे. माझे 75 टक्के यकृत निकामी झाले असून केवळ 25 टक्के भागच कार्यरत आहे. या 25 टक्क्याच्या यकृतावरच माझे आयुष्य सुरु आहे, अशी गंभीर माहिती दिली.
1982 मध्ये गंभीर जखमी झाले होते अमिताभ
ही घटना 1982 मधील आहे. 26 जुलै 1982मध्ये बिग बी मनमोहन देसाई यांच्या 'कुली' सिनेमाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना सिनेमासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला. मात्र तरीदेखील ते शूटिंग करत राहिले. त्याच्या पुढील सीनमध्ये बिग बींना टेबलवर उडी मरायची होती, परंतु त्यांनी उडी मारताच टेबलचा एक कोपरा त्यांच्या पोटात लागला आणि रक्तस्त्राव सुरु झाला. ताबडतोब त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
2 ऑगस्टला झाला पुर्नजन्म
या घटनेनंतर लोकांमध्ये त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. 8 दिवस ते मृत्यूच्या दारात होते. 2 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले. म्हणून 2 ऑगस्ट रोजी आपला पुर्नजन्म झाला असल्याचे बिग बी म्हणतात.